नंदुरबार : जिल्ह्यात एकाच दिवशी करोनाचे सहा पॉझिटीव्ह रुग्ण

नंदुरबार : जिल्ह्यात एकाच दिवशी करोनाचे सहा पॉझिटीव्ह रुग्ण

नंदुरबार जिल्ह्यात आज दिवसभरात करोनाचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. यात शहादा येथील 5 तर अक्कलकुवा येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

नंदुरबार जिल्ह्यात आज दुपारी आलेल्या स्वाब वेब स्वबच्या अहवालात २ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. यात अक्कलकुवा व शहादा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश होता.

सायंकाळपर्यंत 105 अहवाल प्रलंबित होते. रात्री 9 च्या सुमारास यातील 4 रूग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हे चारही रूग्ण शहादा शहरातील असून ते कोरोनाबाधित रुग्णाचे नतेवाईक आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात १२ दिवसापुर्वी कोरोनाचा एकही रूग्ण नव्हता.

मात्र, आता सातत्याने पॉझिटीव्ह रूग्ण आढळत असल्याने ग्रीन झोनमध्ये असलेला जिल्हा रेड झोनकडे वाटचाल करु लागला आहे. आज दुपारी आढळलेल्या रुग्णांमध्ये अक्कलकुवा येथील एक पुरुष (५८) आणि शहादा येथील एक मुलगी (१५) यांचा समावेश होता. शहादा येथील मुलगी दोन दिवसापूर्वी अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आली होती.

दरम्यान, रात्री आलेल्या 4 कोरोना बाधित रुग्णांमध्ये शहादा येथील एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा समावेश आहे. अनुक्रमे 44, 48, 65 वर्ष वयाचे पुरुष तर 12 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.
यासोबतच जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या आता 17 झाली आहे. यात नंदुरबारातील ४ , शहादा येथील 9 तर अक्कलकुवा येथील ४ रूग्णांचा समावेश आहे. यापैकी शहादा येथील एकाच मृत्यू झाला आहे.
सर्व 16 रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत.

नागरिकांना खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होत असेल आणि ज्यांनी मागील पंधरा दिवसात बाहेर काही प्रवास केला असेल त्यांनी लगेच ग्रामीण रुग्णालयात किंवा तहसीलदारांची संपर्क साधून आपली चाचणी करावी, रमजानच्या महिन्यात नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com