अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शाळा प्रवेशास स्थगिती
स्थानिक बातम्या

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शाळा प्रवेशास स्थगिती

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

आदिवासी विकास विभागाच्या २२ मे २०२० च्या शासन निर्णयानुसार सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षांत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेस स्थगिती देण्यात आली आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार कार्यक्षेत्रातील नंदुरबार, नवापूर व शहादा या तीन तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता १ व इयत्ता २ करीता सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षांसाठी शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देण्याकरीता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून विहित नमुन्यात प्रवेश अर्ज मागविण्यात आले होते.

मात्र, सदर प्रक्रीयेस स्थगिती देण्यात आल्याने पालकांनी इयत्ता १ ली आणि २ रीतील आपल्या पाल्यांचा प्रवेश कार्यक्षेत्रातील इतर शाळांमध्ये आपल्या इच्छेनुसार घ्यावा, असे  प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत  यांनी कळविले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com