Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedनंदुरबार : बिअरबारवर पोलीसांचा छापा; तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार : बिअरबारवर पोलीसांचा छापा; तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार – 

लॉकडाऊन असतांना नंदुरबार शहरातील हॉटेल गजराजमध्ये बियरबारमध्ये चोरटी दारूची विक्री होत असतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धाड टाकत 3 लाख 2 हजार 305 रूपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला असुन याप्रकरणी दोघांविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

नंदुरबार शहरातील कोरीट रोडवरील हॉटेल गजराजमध्ये देशी विदेशी दारुची जास्त दरात चोरटी विक्री सुरु असल्याची बातमी मिळाल्यान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, यांच्या पथकाने दि.25 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक हॉटेल गजराजच्या काही अंतरावर उभे राहुन बातमीची अधिक खात्री करण्यासाठी पथकातील एका कर्मचार्‍यास बनावट ग्राहक म्हणून हॉटेल गजराजमध्ये विदेशी दारु घेण्यासाठी पाठविले.

हॉटेल गजराजच्या पाठीमागे असलेल्या दरवाजाने पथकातील कर्मचार्‍यास विदेशी दारुचा बॉक्स जास्त दरात आणुन दिले  पथकातील कर्मचार्‍याने तात्काळ हॉटेल गजराजच्या काही अंतरावर उभे असलेल्या पथकास बोलावुन 7.15 वाजता हॉटेल गजराजमध्ये छापा टाकला .

तसेच हॉटेलच्या काऊंटरवर उभ्या असलेल्या इसम मनोज हिरालाल चौधरी रा. जयचंद नगर, नंदुरबार असल्याचे सांगुन तसेच दारुची जास्त दरात चोरटी विक्री करीत असल्याचे कबुली दिल्याने मनोज हिरालाल चौधरी रा. जयचंद नगर, नंदुरबार ,हॉटेलचा मालक दिलीप हिरालाल चौधरी रा. जयचंद नगर, नंदुरबार या दोन्ही आरोपीतांविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दारुबंदी व आपत्ती व्यवस्थापन कायदासह साथीचे रोग प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस उप-निरीक्षक योगेश राऊत यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पथकाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या