नंदुरबार : सार्वजनिक ठिकाणी अवैध दारू साठा
स्थानिक बातम्या

नंदुरबार : सार्वजनिक ठिकाणी अवैध दारू साठा

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

तळोदा येथील शहादा रस्त्यावरील हॉटेल प्रियंकाच्यामागे आडोश्याला सार्वजनिक जागी अवैध दारू साठा व चोरटी विक्री करतांना आढळलयाने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पो कॉ अनिल पाडवी यांच्या फिर्यादीवरून, दि १३ रोजी १२.३० वाजेच्या सुमारास संजय ब्रिजलाल चौधरी हा शहादा रस्त्यावरील हॉटेल प्रियंकाच्या मागे अवैधरित्या दारूचा साठा जवळ बाळगून व चोरटी विक्री करताना आढळून आला.

पोलिसांनी धाड टाकली तेव्हा त्याजागेवर १९८० रुपये किमतीची कांगारू प्रीमियम माईल्ड बियर, ७८० रुपये किंमतीची मॅक्डोल नं १ रम ,६८६ रुपये किंमतीची किंग फिशर स्ट्रॉंग बियर , २०४० किंमतीचे किंगफिशर एक्स्ट्रा स्ट्रॉंग बियर ,१९८०रुपये किंमतीची किंग फिशर स्ट्रॉंग बियर , ४२०रुपये किंमतीची कांगारू प्रिमियम माईल्ड बियर ,३६० रुपये रोख रक्कम असा एकूण ८२४६ रुपये मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार आहे . पुढील तपास पो.ना. राजधर जगदाळे करित आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com