वाळुच्या डंपरमध्ये गुटख्याची वाहतुक

 10 लाखाच्या गुटख्यासह 35 लाखाचा मुद्देमाल जप्त ,चौघे ताब्यात,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

नंदुरबार  – 

नंदुरबार निझर दरम्यान वाळुच्या डंपरमध्ये विमल गुटख्याची वाहतुक करणार्‍या डंपरवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई करत 35 लाखाचा मुद्देमाल जप्त केला असुन चौघांना ताब्यात घेतले असुन,पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या संपुर्ण जगभरासह भारतात थैमान घातलेल्या कोराना विषाणुचा प्रादुर्भाव होवु नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने संपुर्ण भारतात लॉकडाऊन घोषीत केलेले आहे. महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा गुजरात राज्यातुन नंदुरबार जिल्ह्यात आणुन लॉकडाऊना फायदा घेवुन विमल गुटख्याची चोरटी वाहतुक करुन त्याची जास्त दरात विक्री करणार्‍यांची माहिती काढुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे सक्त निर्देश दिल्याने,

दि.16 मध्यरात्री रोजी गुजरात राज्यातुन निझर मार्गे नंदुरबार येथे मोठया प्रमाणात महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा वाहतुक होणार असल्याची बातमी नुसार पोलीस निरीक्षक किशोर नवले व पथकाने दि. 15 एप्रिल रोजी रात्री 11 वाजेपासुन निझर रोडवर मन्सुरी टेन्ट हाऊसजवळ सापळा लावून बसलेले असतांना दि. 16 एप्रिल रोजी सुमारे 1.30 वाजता सुमारास निझर गावाकडुन एक आयवा डंपर वेगाने नंदुरबारच्या दिशेने येतांना दिसला म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील कर्मचार्‍यांनी बॅटरीच्या सहाय्याने वाहनास उभे करण्याचा इशारा दिला असता संशयीत वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघुन नेला,

म्हणुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची खात्री झाल्याने सदर वाहनाचा पाठलाग करुन शिताफीने वाहनाला थांबवले डंपरमधील आकेश काशिनाथ नाईक , मनिष गणेश ठाकरे,नरेश विनोड पाडवी, राहुल भिका पाडवी सर्व रा. नळवा बु. ता.जि. नंदुरबार यांना ताब्यात घेलले. वाहनांची तपासणी केली असता त्यात पांढर्‍या व खाकी रंगाचे पोते दिसल्याने त्यांना उघडुन पाहिले असता त्यात महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा मिळुन आला.सदरचा डंपर नरेंद्रसिंग राजपुत यांचा असुन त्याने विमल गुटखा गुजरात राज्यातील निझर येथन होलाराम सिंधी यांच्या गोडावून मधुन भरुन माल कुठे उतरवायचा बाबत डंपर मालक नरेंद्रसिंग राजपुत त्यांना नंदुरबार येथे पोहचल्यावर सांगणार होता व त्यावेळेस नरेंद्रसिंग राजपुत हा चारचाकी वाहन (क्र.7100) हिच्याने डंपरच्यापुढे चालक होता असे चालकाने सांगीतले

ताब्यात घेण्यात आलेल्या डंपरच्या मागील बाजुस पाहणी केली असता वाहनात 7 लाख 53 हजार 600 रुपये किंमतीचा विमल पान मसाला गुटख्याचे 30 खाकी रंगाचे पोते,1 लाख 88 हजार 400 रुपये किंमतीचा तंम्बाखूचे 6 पांढर्‍या रंगाचे पोते, 25 लाख रुपये किंमतीचा आयवा कंपनीचा डंपर विमल वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला व 25 हजार रुपये किमतीचा इतर मुद्देमाल असा एकुण 34 लाख 67 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आकेश काशिनाथ नाईक ,मनिष गणेश ठाकरे, नरेश विनोड पाडवी, राहुल भिका पाडवी सर्व रा. नळवा बु. ता.जि. नंदुरबार व ब्रेझा चालक व डंपर वाहनाचा मालक नरेंद्रसिंग राजपुत व होलाराम सिंधी यांचे विरुध्द उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करुन आरोपी व जप्त मुद्देमाल उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस उप-निरीक्षक योगेश राऊत, पोहेकॉ प्रदीपसिंग राजपुत, दिपक गोरे, पोना युवराज चव्हाण, अविनाश चवहाण, पोशि पुरुषोत्तम सोनार, शोएब शेख यांच्या पथकाने केली आहे.