नंदुरबार : ८० वर्षीय वृध्देला करोनाची लागण
स्थानिक बातम्या

नंदुरबार : ८० वर्षीय वृध्देला करोनाची लागण

Balvant Gaikwad

नंदुरबार शहरात एका ८० वर्षाच्या आजीला कोरोनची लागण झाल्याचे अहवाल आज प्राप्त झाला आहे. दरम्यान या आजीवर खाजगी उपचार सुरू असलेला दवाखाना सील करण्यात आला आहे.

नंदुरबार शहरात अहिल्यादेवी चौक भागात राहणार्‍या आणि शहरातील  खाजगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या ८० वर्षाच्या महिला रुग्णाचा कोविड १९ चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णाची प्रकृती गंभीर असून व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. दरम्यान दवाखाना सील करण्यात आला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या आता २१ झाली आहे. यात शहादा येथील ९, नंदुरबार तालुक्यातील ८, अक्कलकुवा येथील ४ रुग्णांचा समावेश आहे. यापैकी नंदुरबार येथील चार व शहादा येथील एक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहादा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

नंदुरबार शहरातील खाजगी दवाखाना सिल करण्यात आला आहे.याच दवाखान्यात नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथील ६८ वर्षीय कोरोनाबाधीत महिलेने येथे उपचार केला होता.दरम्यान डॉक्टरांसह दवाखान्याचा स्टापला क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे. बाजारपेठेत विनाकारण व मास्कशिवाय फिरणे धोकेदायक ठरणार असल्याने नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com