नंदुरबार : सीमा तपासणी नाक्यावरील 16 कर्मचारी क्वॉरंटाइन
स्थानिक बातम्या

नंदुरबार : सीमा तपासणी नाक्यावरील 16 कर्मचारी क्वॉरंटाइन

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

येथील सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत असलेला आरोग्य सहाय्यक धुळे येथील कोरोना पॉझिटीव्ह महिलेच्या संपर्कात आल्याने पोलीस आणि आरोग्य विभागातील 16 कर्मचा-याना क्वारनटाईन करण्यात आले आहे. या घटनेमुळे नवापूरात खळखळ उडाली आहे.

नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा येथे महाराष्ट्र-गुजरात सीमा तपासणी नाका आहे. परराज्यातील वाहन चालकांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, परिवहन विभागाचे पथक तेथे कार्यरत आहे.

यातील एक आरोग्य कर्मचारी धुळे येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेला दोन वेळा गाडीत बसवून रूग्णालयात घेऊन नेले आहे.

याबाबत माहिती कळताच तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, तालुका वैद्यकीय अधिकारी हरिषचंद्र कोकणी यांच्या पथकाने सीमा तपासणी नाक्यावर जाऊन सबंधीत आरोग्य कर्मचा-याला कर्तव्यवरून बाजूला करीत क्वारंटाईन केले आहे.

सोबतच सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक, 10 पोलिस कर्मचारी आणि 5 आरोग्य कर्मचारी अशा 16 जणाना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com