नांदगाव : पोटच्या मुलीचा बापासमोर मृत्यू तर पत्नीने दवाखान्यात सोडला जीव
स्थानिक बातम्या

नांदगाव : पोटच्या मुलीचा बापासमोर मृत्यू तर पत्नीने दवाखान्यात सोडला जीव

Gokul Pawar

Gokul Pawar

नांदगाव : नांदगाव-मनमाड रस्त्यावर असणाऱ्या हिसवळ शिवारात आयशर व मोटारसायकल समोरासमोर धडक झाली. या अपघातात पत्नी-मुलगी ठार तर मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. दोघा मयतावर आज रोजी दफनविधी करण्यात आला असून नांदगाव शहरात सलग दुसऱ्या दिवशी दु:खत घटना घडली. कालच दोघा मित्रांना जलसमाधी मिळाली होती.

दरम्यान अधिक माहिती अशी कि, मोटारसायकल व आयशरच्या अपघातात इकबाल सुलतान खान (रा.नांदगाव ) हे पत्नी आफसाना (३०) मुलगी (१०) जोया यांच्यासह मोटारसायकल (क्रमांक – एम.एच.१५ ए .व्ही.५२९३) हे मनमाडकडून सकाळी ११:०० वाजता येत असताना नांदगावहून हिसवळ शिवारात आयशर (क्रमांक एम.एच.१५ एफ. व्ही. ७७९३) समोरून येणाऱ्या मोटारसायकल जोरदार धडक दिली. यात जोयाचा जागीच मृत्यू झाला तर अफसाना हिला पुढील उपचारासाठी मनमाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असतानाच निधन झाले.

इकबालला गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती कळताच नागरिकांनी व नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. अपघातानंतर आयशर चालकाने घटनास्थळावरुन फरार झाला आहे. याप्रकरणी नांदगाव पोलीसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com