नागपूर हादरले; पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून
स्थानिक बातम्या

नागपूर हादरले; पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून

Dinesh Sonawane

नागपूर : वृत्तसंस्था 

जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील लिंगा या गावातून गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या 5 वर्षीय मुलीचा मृतदेह शेतात सापडल्याने एकच खळबळ उडाली. या मुलीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आला असल्याचे समोर आले आहे.

मृत मुलीचे वडील हे मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील असून गेल्या पाच वर्षांपासून ते मजुरीसाठी लिंगा गावात कुटुंबासोबत राहत असल्याचे समजते.

मृत मुलगी ही स्थानिक जिल्हा परिषदेच्या बालवाडीत शिकत होती. 6 डिसेंबर रोजी मृत ही गावात राहणाऱ्या तिच्या आजीकडे जाते म्हणून घरून निघाली व ती परत आली नाही.

परत का आली नाही म्हणून तिचा शोध घेतला परंतु ती सापडली नाही. दरम्यान, रविवारी सकाळी स्थानिक पोलिस व गावच्या नागरिकांनी शोध घेतला असता ती गावालगत असलेल्या संजय भारती यांच्या शेतात मृत अवस्थेत दिसली.

यावेळी मृतदेहाचा तोंडात बोळा देखील कोंबण्यात आल्याचे निदर्शनास आले. मृतदेहाची तपासणी केली असता तिच्या डोक्यावर दगड मारून हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

पोलिसांनी तपास चक्रे फिरवत शेतात काम करणाऱ्या एका मजुराला ताब्यात घेतले आहे.मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आला आहे. उत्ततरीय तपासणी नंतरच मृत मुलीवर लैंगिक अत्याचार झाला की नाही हे स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, या घटनेचे सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. गावातील नागरिकांनी एकत्र येत संशयितास कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com