विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जामीन मंजूर
स्थानिक बातम्या

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जामीन मंजूर

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नागपूर | माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना जामीन मंजूर झाला. 2014 मधील विधानसभा निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरताना दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवली असा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणामध्ये कनिष्ठ न्यायालयाकडून 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. आज नागपूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी ते हजर झाले होते.

फडणवीस यांच्यावर नागपुरातील 2 गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप आहे. यामध्ये एक मानहानीचा खटला आणि दुसरा फसवणुकीचा खटला आहे. याप्रकरणी सत्र न्यायालयाने याविषयी फडणवीसांना समन्स बजावला होता. त्यानुसार आज ते कोर्टात हजर होते.

फडणवीस म्हणाले, दोन खासगी तक्रारी माझ्याविरुद्ध करण्यात आलेल्या होत्या. यामध्ये माझ्यावर वैयक्तिक आरोप नाहीत. या हे सर्व आंदोलनाचे प्रकरण आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com