Monday, April 29, 2024
Homeनाशिकआधुनिक शिक्षणातून चांगले विद्यार्थी घडविणे हेच माझे ध्येय : सोहनी

आधुनिक शिक्षणातून चांगले विद्यार्थी घडविणे हेच माझे ध्येय : सोहनी

नाशिक | प्रतिनिधी

मविप्रचे कॉलेज १६ वर्षे यशस्वीरीत्या चालविल्यानंतर वेगळे आणि स्वतंत्र करण्याच्या विचारातून आयडीया कॉलेजची उभारणी झाली आहे. यातून नवनवीन कल्पना, विषय, आधुनिक शिक्षण पद्धती समाजापुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. कुठल्याही कॉलेजसोबत स्पर्धा करणे हा मुळीच उद्देश नसून आर्किटेक्चर क्षेत्रात चांगल्या  योगदानाबरोबरच, चांगले विद्यार्थी घडविण आणि या क्षेत्राच्या विकासासाठी काम करणे हाच मुख्य हेतू असल्याचे आयडिया कॉलेजचे माजी प्राचार्य, संचालक असलेल्या प्रा. आर्किटेक्ट विजय श्रीकृष्ण सोहनी यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

‘मासा’ (महाराष्ट्र असोसिएशन ऑफ स्कूल ऑफ आर्किटेक्चर) ने सुर्वणपदक प्रदान करून जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. सोहनी यांच्या रूपाने पहील्यांदाच उत्तर महाराष्ट्रला हा मान मिळाला. या  जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्ताने शहरातील वेगवेगळ्या संस्थांनी एकत्र येऊन प्रा.सोहनी यांचा जाहीर सत्कार केला. त्यावेळी सोहनी यांची मुलाखती घेण्यात आली.

सम्यककडून आयोजित करण्यात आलेला ‘अबाउ अॅण्ड बीऑड’ हा सोहळा कालीदास कला मंदीरात संपन्न झाला. यावेळी वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी सोहनी यांचा सत्कार केला. सोहनी यांचा आजी माजी  विद्यार्थी वर्ग आणि आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनिअर असोसिएशन,  दि इंडियन इंन्स्टीट्यूट ऑफ आर्किटेक्ट आणि  इन्स्टिट्यूट ऑफ इंडीयन इंटेरियर डिझाईनर, नाशिक शाखा,  यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी सोहनी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळालेले मान्यवर आर्किटेक्ट, सहयोगी प्राध्यापक आर्कि. विवेक पाटणकर, मित्रमंडळी आर्कि.उदय कुलकर्णी, आर्कि.रवी जोशी, आर्कि.संजय पाटील, आर्कि.नितीन कुटे, विवेक गरुड, रत्नाकर पटवर्धन परिवार सदस्य  सुनीती शारंगपाणी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी आर्कि.अख्तर चौहान, रज्वी कॉलेज, मुंबई यांनी प्राचार्य सोहनी यांची मुलाखत घेतली.  यावेळी गप्पांच्या माध्यमातून रंगत गेलेल्या मुलाखतीमधून मान्यवरांनी सोहनी यांचा अवघा जीवनपट उलगडून सांगितला. सोहनी यांच्या जीवनातल्या अनेक कडू गोड आठवणीना यातून उजाळा मिळाला. विशेष करून जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधील ऐतिहासिक ठरलेले आंदोलन, नाटकार वसंत कानेटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन, समांतर आणि प्रयोगशील नाट्य चळवळीतला सहभाग, हायस्कूल ग्राउंडसाठी कायदेशीर दिलेले लढा अशा अनेक माहितीपूर्ण आणि विनोदी किस्से यांनी मुलाखतीमध्ये खूपच रंग भरला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयआयएचे आर्कि.प्रदीप काळे, ए अॅण्ड ईचे  आर्कि.योगेश कासार आणि आय आर्कि.आयाआडीच्या तरनुम कांद्री, आर्कि.विवेक सायखेडकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यास्मिन दांडेकर यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या