Video : सकारात्मकतेसाठी एकदा नवं कोरं गाणं ‘मुस्कुराएगा इंडिया’ बघाच

Video : सकारात्मकतेसाठी एकदा नवं कोरं गाणं ‘मुस्कुराएगा इंडिया’ बघाच

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग भीतीच्या सावटाखाली आहे. यातच बॉलिवूडच्या कलाकारांनी एक आशेचा किरण दाखवला आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि निर्माता जॅकी भगनानी यांनी पुढाकार घेत ‘मुस्कुराएगा इंडिया’ या नवीन अँथमच्या माध्यमातून सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे.

गाण्याच्या माध्यमातून आम्ही लोकांना सर्वकाही पुर्वीसारखे सामान्य होईल, फक्त आपण कोविड -19च्या विरोधात एकत्र उभे राहायचे आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करत असलायचे अक्षय कुमार म्हणतो.

‘फिर मुस्कुराएगा इंडिया’ हे बोल असलेल्या या गाण्यात अक्षय कुमार आणि जॅकी भगनानी यांच्यासह राजकुमार राव, टायगर श्रॉफ, कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर, विक्की कौशल, अनन्या पांडे, आयुष्मान खुराणा, किआरा आडवाणी, क्रिती सेनॉन, सिद्धार्थ मल्होत्रा, तापसी पन्नू हे कलाकार झळकले आहेत.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com