जन्मदात्या पित्याकडून दोन मुलींची हत्या
स्थानिक बातम्या

जन्मदात्या पित्याकडून दोन मुलींची हत्या

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

पित्याचा वैफल्यातून आत्महत्येचा प्रयत्न – पिंपळगाव( हरे) येथील घटना

  तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथे जन्मदात्या पित्याने आपल्या दोन अल्पवयीन मुलींना विहीरीत ढकलुन  त्यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटने नंतर स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     पोलीस सूत्रांकडून प्राप्त वृत्ता नुसार  पिंपळगाव (हरे.) ता.पाचोरा येथील रहिवाशी असलेले विकास सुरेश ढाकरे (तेली) हे दि. २२ रोजी सकाळी ७:३० वाजता तनुश्री विकास ढाकरे (वय – १२) व परी (शिवन्या) विकास ढाकरे (वय – ४) या दोन मुलींसह शेळ्यांना चारा-पाणी करण्यासाठी जवखेडा शिवारीतील अरविंद केशवराव शिंदे यांचे शेतात गेले होते.
त्यांच्या शेतात असलेल्या विहीरी जवळ आल्यानंतर विकास ढाकरे यांनी आपल्या जन्मदात्या  दोन्ही मुलींना विहीरीत ढकलुन दिले. व घटने नंतर स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला.  मुलींना काय खाऊ घालु ? त्यांचे पालन पोषण व विवाह कसे होतील या वैफल्यातून त्याने ही टोकाची भुमिका घेतली असे विकास ढाकरे हे घटनास्थळी बडबड असल्याची परिसरात चर्चा होती.
दोन्ही मुलींचे मृतदेह नागरिकांच्या मदतीने विहीरीतुन बाहेर काढण्यात आले. त्यांचे मृतदेह पाचोरा  ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांनी मयतांचे शवविच्छेदन केले.
आरोपी विकास ढाकरे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पिंपळगाव (हरे.) उपविभागीय पोलीस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकाडे यांचे मार्गदर्शनात पिंपळगाव पोलीस करीत आहे.
Deshdoot
www.deshdoot.com