कोयत्याने वार करून एकाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून घडला प्रकार
स्थानिक बातम्या

कोयत्याने वार करून एकाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून घडला प्रकार

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

इंदिरानगर | वार्ताहर

पाथर्डी गावात पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने एकाचा कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना गौळाणे रस्त्यावर घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरु आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरपत सिंह गावीत (वय४० रा. पाथर्डी गाव)  असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संशयित आरोपी विठ्ठल गव्हाणे व नरपत सिंग गावित हे दोघेही पाथर्डी गाव येथून जाणाऱ्या गौळाणे रस्त्यालगत शेजारी शेजारी भाडेतत्वावर राहत होते.

गेल्या पंधरा दिवसापूर्वी या दोघांचे भांडण झाले होते. यामुळे संबंधित घरमालकाने गव्हाणे यास घर खाली करून घेतले होते. शुक्रवार (दि.६) रोजी विठ्ठल गव्हाणे यांना माहीत होते की नरपत सिंग गावित हा सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कंपनीत कामाला जातो.

त्यामुळे गव्हाणे गौळाणे रस्त्यावर दबाव धरून बसला होता गावित येताच गव्हाणे यांनी आपल्या हातातील कोयत्याने गावित यांच्या डोक्यावर आणि शरीरावर सपासप वार केले.

त्यामुळे गावीत त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे दत्तात्रेय पाळदे, राजेश निकम ,संदीप लांडे ,जावेद खान, सागर पाटील ,पोहचले.

तातडीने जखमी गावित यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना सुमारे सहा साडेदहा वाजेच्या सुमारास गावीत यांचा मृत्यू झाला. सदर घटना अनैतिक संबंधातून झाल्याचे समजते संशयित आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शोधक पथक रवाना झाले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com