करोनाने विळखा घातलेल्या मालेगावात सराईताचा निर्घुण खून
स्थानिक बातम्या

करोनाने विळखा घातलेल्या मालेगावात सराईताचा निर्घुण खून

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मालेगाव | प्रतिनिधी

शहरातील नियमत बाग लगत असलेल्या मोती हायस्कूल जवळ पूर्ववैमनस्यातून तिघांनी मोहम्मद तालीब मोहम्मद हनीफ उर्फ तालीब नाट्या वय 23 या सराईताचा धारदार शस्त्रांनी गळा चिरून तसेच पाठीवर व पोटावर वार करीत निर्घुण खून केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली.

या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस यंत्रणेने तपासाची सूत्रे वेगाने हलवत तिघां संशयित हल्लेखोरांना जेरबंद केले आहे. नियामत बाग लगत रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह पडला असल्याची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपाधीक्षक रमाकांत नवले, मंगेश चव्हाण पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

चौकशीअंती सदर मृत युवक तालीम नाट्या असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस अधिकाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवून ओसामा उर्फ आतंक दादा, सलमान उर्फ तारू दादा व नेपाळी या तिघा हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com