Video : पुण्यातील खाकीतला गायक, आवाज ऐकून थक्क व्हाल…
स्थानिक बातम्या

Video : पुण्यातील खाकीतला गायक, आवाज ऐकून थक्क व्हाल…

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : सध्या सोशल मीडियावर पोलिस दलातील कर्मचारी सागर घोरपडे यांच्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रचंड व्हायरल झालेल्या या व्हिडिओला अवघ्या तीन दिवसातच १० लाखाच्या आसपास युझरने बघितला आहे.

पुणे येथे पोलीस शिपाई म्हणून सागर घोरपडे हे कार्यरत आहेत. पोलिसेवेचा वास घेतलेल्या सागर घोरपडे यांच्यातील कलाकार सोशल मीडियाच्या मध्यातून बाहेर आला आहे. सागर घोरपडे यांनी नुकताच एका स्टुडिओमध्ये ‘तुम ही आना’ या गाण्याचे रेकॉर्डिंग केले. त्यानंतर ते फेसबुक आणि युट्युबवर अपलोड केल्यानंतर अवघ्या तीन दिवसात लाखो विव्हस मिळाले.

पोलीस सेवेत असतांना स्वतःतील कला-गुण सादर करण्याची संधीच मिळणं तसं अवघडच. परंतु सागर घोरपडे यांनी स्वतःच्या कलेला वाव दिला. त्यांच्या युट्यूब चॅनलवर अशीच आणखी काही गाणी दिसून येतात.

Deshdoot
www.deshdoot.com