सर्वपक्षीय आमदार फोटोसाठी एकत्र पण फडणवीस ‘आऊट ऑफ फ्रेम’!
स्थानिक बातम्या

सर्वपक्षीय आमदार फोटोसाठी एकत्र पण फडणवीस ‘आऊट ऑफ फ्रेम’!

Gokul Pawar

Gokul Pawar

नागपूर : नागपूरमधील विधीमंडळाच्या चौदाव्या विधानसभेचे गठन झाल्यानंतरचे पहिल्याच अधिवेशनाचा पाचवा दिवस होता. त्यामुळे कामकाजाची सुरुवात होण्यापूर्वी सर्वपक्षीय आमदारांना एकत्रित छायाचित्रासाठी विधानभवनाच्या पाय-यांवर एकत्र करण्यात आले. पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचलेल्या ७८ सदस्यांसह, ज्येष्ठ आमदार या छायाचित्रासाठी उत्साहाने एकत्र जमले. परंतु या फोटोसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मात्र कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीबाबत चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान महाविकास आघाडीचे हे पहिलेच अधिवेशन आहे. मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विरोधीपक्ष नेते आणि सर्वपक्षीय सदस्याचा एकत्रित छायाचित्र करण्याची विधीमंडळाची प्रथा-परंपरा आहे. ज्या विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणा देत आंदोलन करतात, त्याच विधानभवनाच्या आवारात सर्वपक्षीय आमदार छायाचित्रासाठी एकत्र येतात.

चौदाव्या विधानसभेतील सर्व आमदार ज्या फ्रेममध्ये होते त्यात प्रमुख विरोधीपक्षाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष आऊटऑफ फ्रेम झाल्याने असे त्यानी जाणिवपूर्वक का केले याबाबत राजकीय चर्चाना ऊत आला होता.

दरम्यान, “विरोधी पक्षनेत्यांना बोलावले होते. मात्र वैयक्तिक कारणास्तव ते पोहोचू शकले नाहीत,” अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गैरहजेरीवर दिली.

Deshdoot
www.deshdoot.com