‘काई पो चे’ सिनेमातुन पदार्पण आता मुंबई इंडियन्स कडून खेळणार
स्थानिक बातम्या

‘काई पो चे’ सिनेमातुन पदार्पण आता मुंबई इंडियन्स कडून खेळणार

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल) २०२० च्या लिलावात अनेक भारतीय खेळाडूंवरही बोली लावण्यात आली. यावेळी अनेक युवा भारतीय खेळाडूंना यंदाच्या मोसमात संधी मिळाली. यामध्ये एक नाव म्हणजे दिग्विजय देशमुख. दिग्विजय एक उत्कृष्ट बालकलाकार असून त्याने २०१३ मध्ये आलेल्या काई पो चे या हिंदी चित्रपटात अभिनय केला होता. या चित्रपटात सुशांतसिंग राजपूत, अमित साध, राजकुमार राव आदींनी भूमिका केल्या आहेत.

दरम्यान २१ वर्षीय दिग्विजय महाराष्ट्राच्या संघासाठी अ श्रेणीमध्ये आणि ७ टी२० सामने खेळले आहेत. यंदाच्या आयपीएल मध्ये मुंबई इंडीयन्स कडून दिग्विजय खेळणार आहे. त्याला मुंबई इंडियन्सने २० लाख रुपयांच्या बेस प्राइसवर खरेदी केले असून तो अष्टपैलू खेळाडू आहे. आतापर्यंत त्याने घरच्या मैदानावर १०४ धावा जमवल्या असून १५ विकेट्स त्याच्या नावावर आहेत.

दिग्विजयचा जन्म बीड जिल्ह्यात झाला आहे. काई पो चे सिनेमात त्याने युवा खेळाडूची भूमिका केली होती. त्यानंतर पूर्णवेळ क्रिकेटला दिल्यानंतर आता आयपीएम मध्ये झळकणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com