आयसीसी कसोटी क्रमवारीत कोहली पुन्हा ठरला ‘विराट’
स्थानिक बातम्या

आयसीसी कसोटी क्रमवारीत कोहली पुन्हा ठरला ‘विराट’

Gokul Pawar

Gokul Pawar

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला मागे टाकले आहे. नुकत्याच बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केल्याने विराट पुन्हा प्रथमस्थानी आला आहे.

आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत विराट कोहली ९२८ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर स्टीव्ह स्मिथ ९२३ गुणांसह दुसर्‍या स्थानावर घसरला आहे. अ‍ॅशेस मालिकेत उत्कृष्ट कामगिरीनंतर स्टीव्ह स्मिथ प्रथम क्रमांकावर आला होता, परंतु पुन्हा एकदा विराट कोहली या खुर्चीवर विराजमान झाला आहे. विराटने मागील चार कसोटीत एकूण ७७४ धावा केल्या होत्या.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा मार्कस लॅबुशेने प्रथमच पहिल्या दहामध्ये पोहोचला असून तो ८ व्या क्रमांकावर आहे. भारताच्या चेतेश्वर पुजाराने चौथ्या क्रमांकावर तर न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने तिसरे स्थान कायम राखले. गोलंदाजांमध्ये पेसर जसप्रीत बुमराह पाचव्या क्रमांकावर तर ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन ९ व्या क्रमांकावर आहे. पॅट कमिन्स प्रथम क्रमांकावर तर कागिसो रबाडा क्रमांक २ वर आहे.

Deshdoot
www.deshdoot.com