मुंबई कृउबा मतमोजणी : नाशिकचे अद्वय हिरे, जयदत्त होळकर विजयी
स्थानिक बातम्या

मुंबई कृउबा मतमोजणी : नाशिकचे अद्वय हिरे, जयदत्त होळकर विजयी

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी नाशिक विभागातून निवडून द्यावयाच्या दोन जागांचा आज निकाल लागला. यामध्ये मालेगाव येथील अद्वय प्रशांत हिरे यांना नाशिक महसूल विभागातून सर्वाधिक मते मिळाली. अद्वय प्रशांत हिरे यांना ७३८ पैकी ५३० मते मिळाली.

तर लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर यांचाही यात विजय झाला त्यांना ४०२ मते मिळाली. तर सुनील पवार यांना ३०८ मते मिळाली.

या बाजार समिती सदस्यांची निवड ही सन २०१९-२० ते २०२४-२५ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी आहे. नाशिक विभागातून म्हणजेच नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या पाचही जिल्ह्यांतून एकूण ७७८ मतदार होते.

नाशिकमधील आठ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर, जिल्हा बँकेचे माजी संचालक अद्वय हिरे, जळगाव येथील प्रभाकर पवार, सुनील पवार, किशोर पाटील यांचा समावेश होता.

तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील हर्ष शेवाळे, नंदुरबारचे किशोर पाटील तर, धुळ्यातून रितेश पाटील यांनी निवडणुकीत सहभाग नोंदवत चुरस आणली होती.  महाविकास आघाडीतर्फे नाशिकचे जयदत्त होळकर व धुळ्याचे रितेश पाटील यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com