एअरटेलद्वारे महाराष्ट्र आणि गोवामध्ये एअरटेल वाय-फाय कॉलिंग लाँच

एअरटेलद्वारे महाराष्ट्र आणि गोवामध्ये एअरटेल वाय-फाय कॉलिंग लाँच

मुंबई : एअरटेल स्मार्टफोन धारक ग्राहकांचा, इनडोर वॉईस कॉलिंग अनुभव वाढविण्यासाठी ‘भारती एअरटेलने महाराष्ट्र आणि गोवामध्ये त्यांची वॉइस ओवर वाय-फाय सेवा, एअरटेल वाय-फाय कॉलिंग लाँच केली.

’एअरटेल स्मार्टफोन धारक ग्राहकांचा, इनडोर वॉईस कॉलिंग अनुभव वाढविण्यासाठी ‘एअरटेल वाय-फाय कॉलिंग’,आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते. ही नाविन्यपूर्ण सेवा वॉईस कॉलसाठी, वाय-फाय नेटवर्कचा उपयोग करून एक वेगळे चॅनेल बनविते आणि ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर टेल्को ग्रेड कॉल करण्याची परवानगी देते. एअरटेल वाय-फाय कॉलिंगवर सहजपणे स्वीच करता येईल, हे तंत्रज्ञान ग्राहकांना एक उत्तम कॉलिंग अनुभव प्रदान करेल.

‘एअरटेल वाय-फाय कॉलिंग’ द्वारे केलेल्या कॉलसाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही तसेच ही अप्लिकेशन कमीतकमी डेटाचा वापर करते.
भारती एअरटेल, सीईओ-रोहित मारवाह म्हणाले की,“ग्राहकांचा अनुभव आणि आनंद वाढविण्यासाठी, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात एअरटेल प्रथम स्थानी आहे. उत्तम वॉइस कॉलिंग अनुभव देण्यासाठी, एअरटेल वाय-फाय कॉलिंग, एका वेगळ्या स्तरावर काम करेल विशेष करून अश्या क्षेत्रात जिथे मोबाईल कंपन्यांसाठी साइट इंस्टॉलेशन एक आवाहन आहे, तसेच इनडोर कनेक्टिविटी देखील चिंतेचा विषय आहे.

एअरटेल वाय-फाय कॉलिंगसाठी कोणत्याही अप्लिकेशनची आवश्यकता नाही आहे. खाली दिलेल्या स्टेप्सच्या माध्यमातून सहजपणे कोणत्याही स्मार्टफोन वर कॉन्फ़िगर करता येईल.

१) airtel.in/wifi-calling वर आपल्या स्मार्टफोनची कम्पॅटिबिलिटी चेक करा.

२) मोबाइलच्या ऑपरेटिंग सॉफ्टवेअरला लेटेस्ट वर्जन वर अपग्रेड करा जे वाय-फाय कॉलिंगला सपोर्ट करत असेल.

३) मोबाइल फोनच्या सेटिंग मध्ये गेल्यानंतर वाय-फाय कॉलिंगला स्वीचऑन करा.

४) VoLTE ला देखील स्वीच ऑन ठेवा जेणेकरून एक उत्तम अनुभव मिळेल.

v सध्या खालील स्मार्टफोन एअरटेल वाय-फाय कॉलिंगला सपोर्ट करतात

१) अँपल आयफोन के ६एस आणि वरील सगळे आयफोन

२) शाओमी: रेडमी के२०, रेडमी के२० प्रो आणि पीओसीओ एफ१

३) सॅमसंग जे६, ए१०एस, ओएन६, एस१०, एस१० प्लस, एस१० ई आणि एम२०

४) वनप्लस ची ७ आणि ६ सिरीज चे सगळेच फोन

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com