मुक्ताईनगर : ३० वर्षे ज्यांच्यावर टीका केली त्यांनीच साथ दिली – उद्धव ठाकरे

मुक्ताईनगर
ज्यांच्या सोबत तीस वर्षे राहिलो त्यांनी दगा दिला मात्र तीस वर्षे त्यांच्यावर टीका केली त्यांनीच वेळेवर साथ दिली. आता राज्यातील शेतकरी हा केंद्रबिंदू मानून महा विकास आघाडी सरकारने कामकाज सुरू केले आहे.

दोन लाखांपर्यंतची कर्जमुक्ती घोषित करण्यात आली असली तरी यावर आमचे समाधान होणार नाही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारच, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुक्ताईनगर येथील शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या सरकारचा पाया मजबूत असून शरद पवार साहेबांसारखे मार्गदर्शक असताना सरकारला कोणताही धोका नाही.

शेतकरी हाच आमचा सर्वांचा केंद्रबिंदू आहे. त्यासाठी विविध योजना आगामी काळात अमलात आणण्यात येणार आहे.यासाठी सर्वांनी सरकारला सहकार्य करावे, अशीही विनंती त्यांनी यावेळी केली. कार्यक्रमाचे आयोजन मुक्ताईनगर ते आमदार चंद्रकांत पाटील यांचेही कार्यक्रमात तोंड भरून कौतुक केले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *