Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedमुक्ताईनगर : नवविवाहिता ठरली हुंडाबळी

मुक्ताईनगर : नवविवाहिता ठरली हुंडाबळी

 सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल

मुक्ताईनगर – 

येथील अष्टविनायक कॉलनीतील नवविवाहितेचा अचानक मृत्यू झाल्याने मयत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून नवविवाहिता हुंडाबळी ठरली आहे. त्यावरून पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यूचे कारण मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

- Advertisement -

जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील अश्विनी छगन खैरनार हिचा विवाह सहा महिन्यांपूर्वीच मुक्ताईनगर येथील शशिकांत सुरेश मगरे याचे सोबत झालेला होता. माहेरून एक लाख रुपये आणावे म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून तिचा छळ व गांजपाट केला जात होता.

तसेच शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता.व माहेरून एक लाख रुपये आणले नाही तर तुला वागणार नाही अशी धमकी तिला वारंवार सासरच्यांकडून दिली जात होती. इतकेच नाही तर अश्विनीला जेवायलाही दिले जात नव्हते अशाप्रकारे तिच्या मृत्यूस तिच्या सासरचे लोक कारणीभूत असल्याची फिर्याद मयत अश्विनी हिची आई छायाबाई छगन खैरनार (वय 40 वर्षे) राहणार चिंचोली तालुका जिल्हा जळगाव यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिली.

दि. 15 मे अश्विनीची अचानक तब्येत बिघडली असा फोन सासरच्यांकडून आला होता. त्यामुळे चिंचोली येथून अश्विनीची आई व नातेवाईक मुक्ताईनगर येथे हजर झाले परंतु सकाळीच तिच्या राहत्या घरी आकस्मिक निधन झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिची आई व नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर त्यानंतर विवाहितेची आई छायाबाई मगन खैरनार राहणार चिंचोली तालुका जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवविवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पती शशिकांत सुरेश मगरे, सासु कल्पनाबाई सुरेश मगरे व सासरा सुरेश सखा मगरे आणि नणंद परिणीता सुरेश मगरे अशा चौघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात भा .द. वि. 304 (ब ) ,498 (1 ) , 323 ,504 ,506 , 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास भारसके हे करीत आहेत.

माहेरची परिस्थिती अतिशय हलाखीची- वडील नेहमी आजारी असल्याने संसाराचा भार आई , दोन बहिणी या सांभाळत आहेत परंतु लॉकडाऊनमुळे त्यांचेही काम बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेले आहे असे असताना मोठी मुलगी अश्विनी अचानक सोडून गेल्याने खैरनार कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळला आहे. अश्विनीचे अचानक निधन झाल्याने जळगाव येथील चिंचोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या