Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्र‘एमपीएससी’च्या परीक्षा पुढे ढकलल्या

‘एमपीएससी’च्या परीक्षा पुढे ढकलल्या

नाशिक | प्रतिनिधी

‘करोना’चा प्रभाव वाढत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एप्रिल व मे महिन्यात होऊ घातलेल्या परीक्षा स्थगित केल्या आहेत.
पुढील तारीख लवकरच कळवली जाईल असे स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

‘एमपीएससी’ने मार्च रोजी परिपत्रक काढून ‘राज्य सेवा पूर्व परीक्षा ‘ एप्रिल रोजी तर ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब, संयुक्त पूर्व परीक्षा ‘ ही मे रोजी होणार असल्याचे जाहीर केले होते.

राज्यात ‘कोरोना’ रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढविला जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ‘एमपीएससी’ने या परीक्षा स्थगीत केल्या आहेत.

परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक ‘एमपीएससी’च्या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल. तसेच अर्ज भरलेल्या उमेदवारांना एसएमएसद्वारे याबाबत माहिती दिली जाईल, असे ‘एमपीएससी’ने स्पष्ट केले आहे.

अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यात ‘कोरोना’ रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढविला जाण्याची शक्‍यता आहे.

त्यामुळे ‘एमपीएससी’ने या परीक्षा स्थगीत केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर वेळाेवेळी अवलाेकन करावे, असे आवाहन एमपीएससीच्या परीक्षापूर्व विभागाच्या उपसचिवांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या