पंकजाच नाही तर अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात; संजय राऊत यांच्या विधानाने खळबळ
स्थानिक बातम्या

पंकजाच नाही तर अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात; संजय राऊत यांच्या विधानाने खळबळ

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मुंबई : वृत्तसंस्था  

राज्यातील सत्तेचा तिढा नुकताच सुटला. मात्र, काल(दि ०१) पंकजा मुंडे यांनी अपडेट केलेल्या फेसबुक पोस्टनंतर पंकजा मुंडे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून असतानाच आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पंकाजाच नाही तर अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे विधान केल्यामुळे पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात बहुमत असूनही भाजपला सत्ता स्थापन करता आलेली नाही. यानंतर भापला अजून एक मोठा धक्का बसणार असल्यामुळे  पंकजा मुंडेंचा 12 तारखेलाच कळेलही असेही ते म्हणाले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेनेच्या वाटेवर अनेकजण आहेत; संजय राऊत यांच्या विधानाने खळबळ

शिवसेनेच्या वाटेवर अनेकजण आहेत; संजय राऊत यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे काय निर्णय घेतील हे १२ तारखेनंतरचे समोर येईल असेही राऊत याप्रसंगी म्हणाले.

Deshdoot ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಡಿಸೆಂಬರ್ 2, 2019

विधानसभा निवडणुकांमध्ये पंकजा मुंडेचा धक्कादायक पराभव झाला. त्यांच्या हक्काच्या परळी मतदारसंघामधून त्यांचा भाऊ धनंजय मुंडेंकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

राज्यातील सत्ता भाजपने गमावली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आता स्थापन झाले आहे. या सर्व घडामोडीनंतर पंकजा मुंडे यांनी राज्यात राजकीय भूकंप घडवण्याची तयारी सुरु केली असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

रविवारी पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांसाठी फेसबूकवर पोस्ट लिहिली आहे. त्या आता आपल्या कारकिर्दीविषयी मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत.

पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट

Deshdoot
www.deshdoot.com