जिल्हा रुग्णालयात आणखी कोरोना संंशयित ५ रुग्ण दाखल
स्थानिक बातम्या

जिल्हा रुग्णालयात आणखी कोरोना संंशयित ५ रुग्ण दाखल

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा रुग्णालयात सोमवारी पाच संशयितांना दाखल करण्यात आले. त्यांच्या लाळीचे नमुने घेवून ते पुण्याला तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहे.

या संशयित रुग्णांमध्ये चार पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. ते बाहेरुन घरी परतल्यानंतर त्यांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास झाला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जळगावातील ३८ वर्षीय तरुण दुबईहून २१ रोजी घरी परतला.  जळगावातील २४ वर्षीय तरुण युएईहून १३ रोजी परतला आहे. सावदा येथील ३२ वर्षीय तरुण थायलंडहून १ मार्च रोजी घरी आला आहे. भुसावळ येथील ५४  वर्षीय महिला दुबईहून १५ रोजी घरी आली आहे. तिचाही या संशयितांमध्ये समावेश आहे.

तसेच एरंडोल येथील २४ वर्षीय तरुण मुंबईहून १८ रोजी घरी आला आहे. त्यांनी जिल्हा रुग्णालयात स्वच्छेने तपासणी करुन घेतली.  या रुग्णालयातील कोरोना नियंत्रण कक्षात रविवारी दाखल झालेले दोन आणि सोमवारचे पाच असे एकूण सात संशयित रुग्ण आहेत.

आतापर्यंत एकूण २८ रुग्णांची तपासणी झाली. यातील १९ अहवाल निगेटीव्ह आले. दोन नमुने पुण्यातील प्रयोगशाळेने नाकारले आहेत. तर सात अहवाल प्रतीक्षेत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com