खुशखबर : पुढील पाच वर्षे १० ते १५ टक्क्यांनी वीजदर कमी होणार; वीज नियामक मंडळाचे आदेश

खुशखबर : पुढील पाच वर्षे १० ते १५ टक्क्यांनी वीजदर कमी होणार; वीज नियामक मंडळाचे आदेश

मुंबई : घरगुती, औद्योगिक आणि शेती वर्गासाठी  महावितरणकडून आनंदाची बातमी देण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांसाठी राज्यातील विजेचे दर कमी होणार असून नुकतेच आदेश वीज नियामक मंडळाला देण्यात आले आहेत. यानुसार नवीन विजेचे दर 10 ते 15 टक्क्यांनी कमी होणार असून एप्रिल 2020 पासून लागू असतील.

तसेच टाटा आणि अदानी या दोन्ही कंपन्यांना घरगुती 11 टक्के, औद्योगिक 19 टक्के आणि व्यापारी 19 टक्के दर कमी करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईमध्ये तीन कंपन्या वीजपुरवठा करतात. त्यातील बेस्ट (बॉम्बे इलेक्ट्रिकल सप्लाय ट्रान्सपोर्ट) ला, घरगुती दर दीड ते दोन टक्के, औद्योगिक सात आठ टक्के वीजदर कमी करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.

तर संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. घरगुती वीज ग्राहकांना पाच टक्के वीज दर कमी होतील. उद्योग क्षेत्रातील दहा ते अकरा टक्के आणि व्यापार क्षेत्रातील वीजदर अकरा ते बारा टक्क्यांनी कमी होणार असल्याचा एकूण अंदाज बांधला जात आहे. तर शेती क्षेत्राचे एक टक्क्याने वीजदर कमी होणार आहेत.

हे दर पुढील पाच वर्षांकरिता असतील असे संग्नाय्त आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील पुढील तीन महिने वसुली स्थागिक करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशभरातील दुकाने आणि उद्योग बंद झाल्याने ही सूट देण्यात येणार आहे.

दरम्यान हे दर कमी केल्याने शासनाच्या तिजोरीवर कुठल्याही प्रकारचा अधिभार पडणार नसल्याची माहिती राज्य वीज नियामक मंडळाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com