Photo Gallery : मेट, भुजबळ नॉलेज सिटी मध्ये अवतरली शिवशाही
स्थानिक बातम्या

Photo Gallery : मेट, भुजबळ नॉलेज सिटी मध्ये अवतरली शिवशाही

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

मेट, भुजबळ नॉलेज सिटीचा उत्सव २०२० चा दुसरा दिवस कार्टून वर्कशॉप, मेट्स गॉट टॅलेंट, झुंबा, रायफल शुटींग, ऑक्सिजन योगा, रॅप म्युझिक व ट्रॅडिंशनल डे थीमने गाजला. भरगच्च कार्यक्रम, सजावट, पारंपारिक वेशभूषेत आलेले विद्यार्थी ने सर्वत्र धमाल आली. शिवाजी महाराजांच्या काळातील वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांच्या रूपाने महाविद्यालयात शिवशाही अवतरल्याचे चित्र होते.

यात सोनेपे सुहागा म्हणजे ‘मेकअप’ या येऊ घातलेल्या मराठी चित्रपटाचे कलाकार चिन्मय उदगीरकर, रिंकू राजगुरू व दिग्दर्शक गणेश पंडित व सर्व टीमने मेट बीकेसी कॅम्पसला भेट दिली आणि सर्व वातावरणच बदलून गेले.

डॉ. शेफाली भुजबळ, दुर्गाताई वाघ यांनी चिन्मय उदगीरकर, रिंकू राजगुरू व दिग्दर्शक गणेश पंडितचे स्वागत करून सत्कार केला. कलाकाराबरोबर स्टेजवर सर्व इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डायरेक्टर, रजिस्टार, प्राध्यापक, सर्व स्टाफ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेकअप टीमने देखील मेट, भुजबळ नॉलेज सिटीचे यावेळी आभार मानले.

Deshdoot
www.deshdoot.com