दिंडोरी येथील वैद्यकिय व्यावसायिकाची आत्महत्या
स्थानिक बातम्या

दिंडोरी येथील वैद्यकिय व्यावसायिकाची आत्महत्या

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

दिंडोरी । प्रतिनिधी

दिंडोरी येथील वैद्यकिय व्यावसायिकानी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दिंडोरी येथील पालखेड रस्त्यावरील आशिर्वाद हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुनिल वामनराव पवार (वय 52)  यांनी गुरुवारी रात्री हॉस्पिटलच्या गच्चीवर असलेल्या खोलीमध्ये जावून दरवाजा बंद केला.

यानंतर त्यांनी विषारी औषध सेवन केले. कुटूंबियाना दरवाजा बंद केल्याचे लक्षात येताच त्यांनी शेजार्‍यांना बोलावले. युवकांनी दरवाजा तोडला व डॉ.सुनिल पवार यांना तातडीने  रुग्णालयात दाखल केले.

परंतु त्यांच्यावर उपचार सुरु असताना प्राणज्योत मालवली. सकाळी हे वृत्त शहरात पसरताच सर्व वैद्यकिय व्यावसायिकांनी डॉ.सुनिल पवार यांच्या निवासस्थानी धाव घेतली.

आत्महत्याचे कारण नेमके समजु शकले नाही. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. डॉ.सुनिल पवार यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोेलिस निरीक्षक जाधव, पोलिस हवालदार आव्हाड करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com