Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमालेगाव तालुक्यात मास्क अनिवार्य; मास्क वापरताना अशी घ्या काळजी

मालेगाव तालुक्यात मास्क अनिवार्य; मास्क वापरताना अशी घ्या काळजी

मालेगाव | प्रतिनिधी

मालेगाव शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. यापार्श्वभूमीवर आजपासून मालेगाव पुढील १५ दिवस संपूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवांच्या व्यतिरिक्त कोन्हीही घराबाहेर पडू  शकणार नाही. दरम्यान, तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. संपूर्ण मालेगाव शहरासह तालुक्यात मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेने ‘कोरोना’ विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे. तसेच ‘कोरोना’ विषाणूचा प्रसार देशात व राज्यात गतीने होत आहे. राज्य शासनाने ‘कोरोना’ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. परस्पर संपर्कामुळे या विषाणूचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेवून मानवी जीविताला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला संकट निर्माण होवू शकते.

कोरोना विषाणुचा (कोविड-19) संसर्ग रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 या कायद्यातील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी मालेगाव तालुक्यातील नागरिकांना मास्कचा वापर अनिवार्य राहील. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्यांकडून रु.500/- इतका दंड आकारण्यात येणार आहे.

मास्कचा वापर कसा करावा

 मास्कचे प्लिट खालील बाजूस उघडा व नाक, तोंड आणि हनुवटी झाकून जाईल अशा पद्धतीने लावावा.
 नाकावर ठेवण्यायोग्य भाग नाकाच्या हाडावर बसवा. वरील दोरीस खालील दोरी बांधलेली असून दोरी कानाच्या वरून मानेच्या मागील बाजूस घेऊन बांधावी.
 आपला चेहरा व मास्क यामध्ये अंतर असू नये याची खात्री करा.
 मास्क खाली खेचू नका किंवा मानेला लटकता ठेऊ नका.
 मास्क वापरत असताना त्याला सतत स्पर्श करणे टाळा.
 मास्क काढण्यासाठी योग्य पद्धतीचा वापर करा. (मास्क मागील बाजूने काढा. मास्कच्या पुढील भागाला स्पर्श करू नका.) प्रथम दोरीचा खालचा भाग व त्यानंतर वरचा भाग काढा आणि दोरीच्या वरच्या बाजूचा वापर करून मास्क हाताळा. मास्क काढताना इतर पृष्ठभागास स्पर्श करू नका.
 मास्क अधिक ओलसर, फेकण्याजोगा झाल्यास तो त्वरित बंद कचरापेटीत फेकून द्यावा. व नवीन मास्कचा वापर करावा. एकदाच वापरावयाचा मास्क पुन्हा वापरू नये.
 मास्क काढल्यानंतर किंवा जेव्हा आपण अनवधानाने त्याला स्पर्श करतो तेव्हा त्वरित आपले हात साबण व पाणी वापरून स्वच्छ धुवा. एकदाच वापरण्यायोग्य मास्क पुन्हा वापरू नये. काढल्यानंतर त्याची घरगुती ब्लीच सोल्युशनमध्ये भिजवून त्वरित बंद कचरापेटीत फेकून विल्हेवाट लावावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या