कऱ्होळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंदाबाई लाव्हरे बिनविरोध
स्थानिक बातम्या

कऱ्होळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंदाबाई लाव्हरे बिनविरोध

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

घोटी | वार्ताहर

इगतपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या कऱ्होळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंदाबाई निवृत्ती लाव्हरे यांची आज बिनविरोध निवड झाली आहे.

अध्यासी अधिकारी तथा धारगावचे मंडळ अधिकारी नानासाहेब बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज झालेल्या विशेष बैठकीत ही निवड झाली. मावळत्या सरपंच लताबाई अशोक आघाण यांनी आवर्तन पद्धतीने दिलेल्या राजीनाम्यामुळे सरपंच निवडणूक घेण्यात आली होती.

माजी सरपंच पांडुरंग खातळे यांच्या गटाची कऱ्होळे ग्रामपंचायतीत सत्ता आहे. रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी मंदाबाई निवृत्ती लाव्हरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला.

यावेळी मावळत्या सरपंच लताबाई आघाण, उपसरपंच आशाबाई खातळे, ग्रामपंचायत सदस्य संगीता खातळे, गंगाराम भगत, दादा भवर, निवृत्ती लाव्हरे उपस्थित होत्या.

अध्यासी अधिकारी तथा धारगावचे मंडळ अधिकारी नानासाहेब बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी नितीन कल्याणकर, ग्रामसेवक अनिल कदम आदींनी कामकाज पहिले. ग्रामस्थांनी नवनियुक्त सरपंच मंदाबाई लाव्हरे यांचे अभिनंदन केले. यावेळी ग्रामस्थांनी निवडीचे स्वागत करून जल्लोष केला.

Deshdoot
www.deshdoot.com