मलकापूर नगराध्यक्ष होम क्वाॅरंटाईन
स्थानिक बातम्या

मलकापूर नगराध्यक्ष होम क्वाॅरंटाईन

Balvant Gaikwad

कोरोना ने देशभरात थैमान घातले असुन नगराध्यक्ष अॅड हरीश रावळ यांनी अग्रस्थानावर राहत नगरपालिका कर्मचारी व नगरसेवकांसोबत शहरवासीयांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना राबविल्या,अक्सिडेंट असो किंवा कुणी कोणत्याही अडचणीत असो रावळ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.
नागपुरातुन आलेल्या मलकापुरवासी रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे, शहरातील प्रमुख रस्त्यांसह वार्डातील रस्तेही सिल करण्यात आले असुन त्याच्या नातेवाईकांनी तपासणी साठी ताब्यात घेण्यात आले आहे.
याच ईसमासोबत चार दिवसांपुर्वी त्याच्या नातेवाईकाच्या अंत्यविधीची परवानगी घेण्यासाठी नगराध्यक्ष हरीश रावळ त्याच्यासमवेत शहर पोलीस स्टेशन मध्ये गेले परवानगी अर्जही लिहून दिल्याने, प्रार्थनास्थळावर व स्मशानभुमीतही  साधारणतः दोन तिन तास सोबत असल्याने त्या कोरोना  पाॅझेटिव्ह रुग्णाच्या रावळ हे संपर्कात आले असल्याचे प्रशासकीय अधिकारीर्यांच्या नजरेत आल्याने त्यांना ही होमक्वारंटाईन ची सुचना देण्यात आली.
घर छोटेखानी असल्याने व घरातील कुणी संपर्कात येवु नये म्हणून  रावळ यांनी बोदवड रोडवरील राजेंद्र चव्हाण यांचे शेतात एकांतात वास्तव्य केले आज दुपारी हरीश रावळ तपासणी साठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
Deshdoot
www.deshdoot.com