Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedमलकापूर शहरात दोन ठिकाणी भीषण आग

मलकापूर शहरात दोन ठिकाणी भीषण आग

येथील नादुरा रोडवरील एम एम जिनिंग फक्टरीला आज दुपारी अचानक लागलेल्या आगीत लागो रूपयांच्या कापुस गठानी जळुन खाक झाल्याची घटना घडली.
तर याच वेळी मलकापूर येथीलच लक्ष्मी नगर परिसरात असलेल्या चैतन्य अॅग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये असलेल्या वेस्ट प्लाॅस्टीक मटेरियल ला आग लागल्याची घटना घडली.
शहरातील एम एम जिनिंग फॅक्टरी व चैतन्य अॅग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कंपनीला आज दुपारी भिषण आग लागली होती तर लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले असुन या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष अॅड.हरीश रावळ यांनी अग्निशमन ला प्राचारण करून घटनेची माहिती देत नगरसेवक राजेंद्र वाडेकर,राजु फुलोरकर सह तात्काळ घटनास्थळी धाव घेऊ आग विझविली.
यात एम एम जिनिंग फॅक्टरी मध्ये असलेल्या कापुस गठाणी वर झाकलेले प्लाॅस्टीकचे पडम हवेने उडुन विजेच्या तारावर पडल्याने या ठिकाणी शाॅर्टसर्किट होऊन आग लागल्याचा  अंदाज व्यक्त केला जातोय..तर लक्ष्मी नगर परिसरात असलेल्या चैतन्य अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला लागुन असलेल्या पाठीमागील धुऱ्यावर काही जळाल्याने आग लागल्याचं सांगितले जातयं.
या आगीत कंपनीत असलेल्या वेस्टेज प्लाॅस्टीक मोठ्या प्रमाणात जळालं आहे मात्र याठिकाणी आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही ..तर याच वेळी कंपनीच्या दुसऱ्या बाजुने ही आग लागली होती मात्र नगराध्यक्ष अॅड.हरीश रावळ यांनी अग्निशमन च्या सहाय्याने ती ही आग विझविण्यास यश मिळिवले .
विशेष म्हणजे चैतन्य अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ज्या ठिकाणी आग लागली होती त्या ठिकाणी एक एसीड ने भरलेले ट्रक उभा होता तर या ट्रकची चाबी ही या कंपनी मालक किंवा तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांकडे नसल्याने अग्निशमन दलाला जिव मुठीत धरून तारेवरची कसरत करावी लागली..तर हा ट्रक कंपनीत वाहकाने संपूर्ण लाॅकडाऊन असल्याने याठिकाणी उभा करून वाहनचालक नागपुर येथे गेला असल्याचे ही कंपनीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
दोन्ही कंपन्यांचे मालकांना कंपनीत आग लागल्याची माहिती दिली अॅड. रावळांनी एम.एम.जिंनिंगला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशामक घेऊन गेलेल्या नगराध्यक्ष व सहकारी नगरसेवकांना नांदुरा रोडकडेही मोठा धुर निघत असल्याचे दिसताच रावळ अग्नीशामक घेऊन चैतन्य अॅग्रो मध्ये पोहचले, क्षणाचाही विलंब न लावता अग्नीशामक दलाने आग विझवल्याने पुढील अनर्थ टळाला.
- Advertisment -

ताज्या बातम्या