संतापजनक : मालेगावी कोरोनाबाधित थुंकला रुग्णवाहिका चालकावर; वाईटसाईट शिवीगाळही केली

संतापजनक : मालेगावी कोरोनाबाधित थुंकला रुग्णवाहिका चालकावर; वाईटसाईट शिवीगाळही केली

मालेगाव | प्रतिनिधी 

जीवन हॉस्पिटल ऐवजी मन्सूरा युनानी रुग्णालयात दाखल केले जात नसल्याने संतप्त झालेल्या करुणा बाधित रुग्णांनी रुग्णवाहिका चालकास बेदम मारहाण केली. यावेळी चालकांच्या अंगावर थुंकण्याचा धक्कादायक प्रकार देखील या रुग्णाने केला. या घटनेमुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे आरोग्य सेवकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, या घटनेची मनपा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून मारहाण व अंगावर थुंकणाऱ्या रुग्णाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. याबाबतची माहिती उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.

शहरातील कोरोना बाधित रुग्णांना जीवन हॉस्पिटल मध्ये तर या आजाराने प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांना सामान्य रुग्णालयात ठेवले जात आहे. तर काही रुग्णांना मन्सूरा युनानी वैद्यकीय रुग्णालय तसेच मनपाच्या इतर रुग्णालयांमध्ये ठेवण्याचे नियोजन मनपा प्रशासन तर्फे करण्यात आले आहे.

काल पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णास जीवन हॉस्पिटल येथे रुग्णवाहिकेतून नेले जात असताना त्याने जीवन ऐवजी मन्सुरा युनानी मध्ये घेऊन जाण्यास चालकास संगितले. मात्र, जीवन हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधितांवर उपचार होत आहेत.

मन्सुरा रुग्णालयात इतर रुग्ण आहेत तिथे आपणास नेता येणार नाही असे सांगितले. यानंतर तुम्हाला जीवन हॉस्पिटलमध्येच घेऊन जाण्याचे आदेश आहेत. अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र मन्सूरा येथे नेले जात नसल्याने संतप्त झालेल्या रुग्णाने चालकाला  शिवीगाळ दमबाजी करत बेदम मारहाण केली.

यावेळी त्याने चालकाच्या अंगावर थुंकण्याचा थुंकण्याचा प्रकार देखील केला. या घटनेने आरोग्य सेवक काम मध्ये एकच खळबळ उडवून संतापाचे वातावरण पसरले आहे.

पोलीस बंदोबस्ताची मागणी

कोरोना बाधित रुग्णांना केलेली मारहाण तसेच सेवकांना होत असलेल्या दमबाजीच्या पार्श्वभूमीवर जीवन हॉस्पिटल सह इतर रुग्णालयांमध्ये पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी पोलिस अधीक्षकांना पत्राद्वारे केली आहे. रुग्णवाहिका चालकाला मारहाण केल्या प्रकरणी संबंधित रुग्णांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशी माहिती मनपा उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.  दिवस-रात्र कार्यरत राहून या आपत्कालीन परिस्थितीत परिश्रम घेणाऱ्या सेवकांवर असे प्रकार  झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com