मालेगावात करोनाचा कहर सुरूच; एकाच दिवसात वाढले १४ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या पोहोचली ११० वर
स्थानिक बातम्या

मालेगावात करोनाचा कहर सुरूच; एकाच दिवसात वाढले १४ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या पोहोचली ११० वर

Dinesh Sonawane

मालेगाव | प्रतिनिधी

मालेगाव शहरात करोना बाधित रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज सकाळी नव्याने पाच रुग्ण बाधित आढळून आल्यानंतर सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालाअंती आणखी नऊ बाधित सिद्ध झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आता एकट्या मालेगावमध्ये करोनाचे एकूण ११० रुग्ण झाले आहेत. तर १० रुग्ण करोना मुळे दगावले आहेत. याबाबतची माहिती सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पाटील यांनी दिली आहे.

आज सकाळी करोनाचे पाच रुग्ण बाधित आढळून आल्याने मालेगावमधील करोना बाधितांची आकडेवारी १०१ वर पोहोचली होती. दरम्यान,  सायंकाळी ९ अहवाल प्राप्त झाले असून सर्वजण बाधित आढळून आले आहेत. त्यांमुळे मालेगाव शहरातील करोना बाधितांची संख्या ११० वर पोहोचली आहे.

आतापर्यंत मालेगावमध्ये  दहा बाधित रुग्ण दगावले आहेत तर काल दोन संशयितांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही संशयितांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.

आजच्या वाढलेल्या आकडेवारीमुळे सायंकाळी पाच वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यातील करोना बाधितांची आकडेवारी १२४ वर पोहोचली आहे. यामध्ये मालेगाव शहरात ११०, नाशिक शहरात १०, नाशिक जिल्ह्यातील इतर तालुक्यात ०४ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये एक निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक येथील पहिला कोरोना बाधित रुग्ण करोना मुक्त झाला आहे. तर नाशिक शहरातील गोविंद नगर परिसरातील रुग्ण करोनामुक्त झाला आहे.

मालेगाव शहरात आतापर्यंत दहा रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. मालेगावमध्ये सुरुवातीला जे अटकाव क्षेत्र होते त्याच्या बाहेरील रुग्ण मालेगावात आढळून आल्यामुळे अटकाव क्षेत्रांची संख्या वाढविली आहे. मालेगावातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Malegaon New 9 Positive

Nashik Corporation:
Positive:10
Death:00
Recovered:01

Nashik Rural:
Positive:04
Death:00
Recovered:01

Malegaon Corporation:
Positive: 110
Death:09

NASHIK DISTRICT Total
Positive :124

Deshdoot
www.deshdoot.com