Monday, April 29, 2024
Homeनाशिकपोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह मालेगावात तळ ठोकून; संकटात सहकाऱ्यांसोबत सेवक, कुटुंबियांची...

पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह मालेगावात तळ ठोकून; संकटात सहकाऱ्यांसोबत सेवक, कुटुंबियांची घेतायेत काळजी

नाशिक । प्रतिनिधी

मालेगाव हा करोनाचा हॉटस्पॉट ठरला असून जिल्ह्यातील अधीर्र् पोलीस यंत्रणा मालेगावात आहे. अशातच अनेक पोलीसांना करोनाची लागण झाल्याने चिंतेचे वातावरण आहे. परंतु अशा संकटाच्या काळात आपल्या सहकार्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरतीसिंह मालेगाव येथे तळ ठोकून आहेत. तसेच प्रत्यक्ष बंदोबस्तासह सर्व ठिकाणी भेट देऊन पोलीस सेवकांची काळजी घेत असल्याचे सकारात्मक चित्र पाहावयास मिळत आहे.

- Advertisement -

मालेगावात कोरोना विषाणूच्या रूग्णांची संख्या दोनशेचा टप्पा पार करून गेली आहे. एकट्या मालेगावात 1 हजार 300 पोलीस अधिकारी, सेवक कार्यरत आहेत. एसआरपीएफचे जवान तसेच पोलीस मिळून सुमारे 37 जणांना करोनाची लागण झाली आहे. यामुळे पोलीस दलात चिंता पसरली आहे.

यामुळे आपल्या दलाची मानसिकता सदृढ करण्यासाठी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक यांनी केवळ आडगाव येथील मुख्यालयात न थांबता त्यांनी आपल्या दोन महान मुलींना आईच्या हवाली करत मालेगाव गाठले आहे. गेली काही दिवसापासून मालेगाव येथे तंबूमध्ये सहकार्यांसमवेत त्या राहत आहेत.

तेथे राहण्याबरोबरच त्यांनी मालेगाव येथे विविध उपक्रम राबवत आहेत. पोलीस दलातील प्रत्येकाची आरोग्य तपासणी, त्यांना सुविधा याच्याकडे वैयक्तीक लक्ष देण्याबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांनी आघाडी घेतली आहे. मालेगावात अतीशय गरीब, ज्यांना रेशन कार्डही नाही. अशा हातमाग कामगारांना, गरीब व गरजु नागरीकांना पोलीस दलाने डॉ. सिंह यांच्या पुढाकाराने अन्नाधान्य तेसच औषधे वाटप केले आहे.

पोलीस अधीक्षक डॉ आरती सिंह यांनी बुधवारी रात्री मालेगाव शहरात लावण्यात आलेले फिक्स पॉईंट चेक करून तेथील अधिकारी व कर्मचारी यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच त्यांना कोरोना विषाणू च्या बचाव होण्या साठी सम्पूर्ण किटचे वाटप करण्यात आले आहे.

आरोग्यबाबत पोलीस अधीक्षक या कर्मचारी यांची स्वतः काळजी घेत असून कोणाला आपल्या आरोग्याची काही अडचण असल्यास त्यांनी तात्काळ तपासणी करून घेण्याचा सूचना दिल्या. जिल्ह्याच्या प्रमुख म्हणुन आपल्या मुख्यालयी बसून सुचना देऊनही डॉ. सिंग काम करू शकल्या असत्या. परंतु पोलीस दलातील सर्व सहकार्यांचे संकटात मनोधैर्य वाढवण्यासाठी आपणही त्यांच्यासोबत असल्याचे डॉ. सिंग यांनी सांगितले.

मी माझ्या सहकार्‍यांसोबत

जिल्ह्यात कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी पोलीस सर्वप्रथम धावून जातात. ती परिस्थिती आम्ही नियंत्रणात आणतो हे सर्व माझ्या प्रीत्येक पोलीस अधिकारी, कर्मचार्यांमुळे शक्य आहे. सध्या मालेगावमध्ये करोनाचे प्रमाण अधिक आहे. तेथे माझे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांनाही करोनाची लागण झाली आहे. संकटात अधिकारी केवळ आदेश देऊन मोकळे होतात, असे त्यांना वाटायला नको. तर आम्ही प्रत्येक संकटात तुमच्या सोबत आहोत. आणि संकटाला आपण एकजुटीने तोंड देऊ हा संदेश देण्यासाठी मी माझ्या सहकार्यांसोबत आहे.

डॉ. आरती सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक

पोलीसांसाठी आरोग्य शिबिर

वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने बुधवारी (दि.29)मालेगाव येथील बालाजी लॉन्स येथे पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांंच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी हे काम करत असताना त्यांचे आरोग्याची काळजी म्हणून व त्याच बरोबर त्यांचे कुटुंबीयांचे देखील आरोग्य चांगले राहवे व कोरोना संसर्ग पासून संरक्षण व्हावे , त्यांनी आहार कसा घ्यावा,सामाजिक अंतर कसे ठेवावे याबाबत डॉक्टरांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन एसएमबीटी वैदयकीय महाविद्यालय यांचे वतीने करण्यात आले होते. या शिबिरात मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकार, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांनी सहभाग नोंदविला.

- Advertisment -

ताज्या बातम्या