संपूर्ण मालेगाव शहराची प्रतिबंधित क्षेत्राकडे वाटचाल; आज ३२ करोना पॉझिटिव्ह; जिल्ह्यात रुग्णसंख्या पोहोचली ५०३ वर
स्थानिक बातम्या

संपूर्ण मालेगाव शहराची प्रतिबंधित क्षेत्राकडे वाटचाल; आज ३२ करोना पॉझिटिव्ह; जिल्ह्यात रुग्णसंख्या पोहोचली ५०३ वर

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक/मालेगाव

मालेगाव शहरातील रुग्णसंख्या काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये. आज तीन वेगवेगळ्या अहवालात जवळपास ३२ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. आज वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे मालेगावचा आकडा वाढून ४१३ वर पोहोचला आहे. दुसरीकडे आज दाभाडीतील एका २७ वर्षीय महिलेलाही करोनाची बाधा झाल्याने करोनाचा शिरकाव आता मालेगावसह परिसरात होत असल्याचे दिसून येत आहे.

मालेगावात आज दिवसभरात प्रशासनाला १३८ रिपोर्ट प्राप्त झाले. त्यातील १०७ निगेटिव्ह, तर ३२ रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. त्यात ३० नवीन रुग्ण पॉझिटिव्ह असून, दोघांची दुसरी चाचणी बाधित आढळून आली आहे.

आज आढळून आलेले रुग्ण हे कृषी नगर, साने गुरुजी नगर, हिम्मतनगर, दत्त नगर परिसरातील असल्यामुळे याठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र आता वाढणार आहे. मालेगावात आधीच प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ५५ वर गेल्यामुळे अर्ध्या शहरापेक्षा अधिक शहर प्रतिबंधित आहेत. आज नवीन भागातून रुग्ण आढळून आल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढणार असून परिणामी संपूर्ण शहराची वाटचालच प्रतिबंधित क्षेत्राकडे होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

काल रात्रीपर्यंत मालेगावमधील रुग्णसंख्या ३८१ वर पोहोचली होती.  आज यात आणखी ३२ रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या आता ४१३ वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता ५०३ वर पोहोचली आहे.  अद्याप ८०५ रुग्णांच्या नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आज तीन टप्प्यात मालेगावचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये सुरुवातील दोन त्यानंतर १९ रुग्ण बाधित आढळून आले. दरम्यान, यानंतर लगेचच एक आकडेवारी जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली यामध्ये जवळपास ११ अहवाल बाधित आढळून आले आहेत.

आज आलेल्या अहवालात तीन पोलीस, एक पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तसेच दोन महिन्याच्या व ७ वर्षांच्या मुलीचाही यात समावेश असून खळबळ उडाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील करोना बाधित

नाशिक ग्रामीण

एकूण रुग्ण ५२
पूर्णपणे बरे ०२
मृत्यू ००
प्रलंबित अहवाल ६४

नाशिक मनपा

एकूण रुग्ण २२
पूर्णपणे बरे ०३
मृत्यू ०१
प्रलंबित अहवाल ३८

मालेगाव मनपा

एकूण रुग्ण ४१३
पूर्णपणे बरे २८
मृत्यू १४
प्रलंबित अहवाल ६९७

जिल्हा बाहेरील रुग्ण
एकूण रुग्ण १६
पूर्णपणे बरे ००
मृत्यू ००
प्रलंबित अहवाल ०६

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com