Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमालेगावात ४ वर्षीय बालिकेला करोनाची लागण; आज ८ पाॅझिटिव्ह; जिल्ह्यातील रुग्णसंख्या १४२...

मालेगावात ४ वर्षीय बालिकेला करोनाची लागण; आज ८ पाॅझिटिव्ह; जिल्ह्यातील रुग्णसंख्या १४२ वर

मालेगाव | प्रतिनिधी 

मालेगाव शहरात आज आणखी आठ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले आहेत. यामध्ये एका चार वर्षांच्या बालिकेचा समावेश आहे. आज साडेचार वाजता आलेल्या अहवालानंतर मालेगावमधील करोना बाधितांची संख्या १२६ झाली असून ११ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील करोना बाधितांची आकडेवारी आता १४२ वर पोहोचली आहे.

- Advertisement -

आज मालेगावमध्ये आढळून आलेल्या रुग्णांमध्ये तिघे रुग्ण नया इस्लामपुरा परिसरातील आहेत. तर हकीम नगर आणि शहरातील उस्मानाबाद परिसरातील दोघांचा समावेश आहेत. तसेच जाफरानगर परिसरातील एका वृद्धेचा अहवाल आज बाधित आढळून आला आहे. ०४ वर्षांची बालिका आणि २५ वर्षांची महिला या दोन्हीही नया इस्लामपुरा परिसरातील आहेत.

वरील सर्व वरील सर्व रुग्णांवर मालेगावमधील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मागील बाधित आढळून आलेल्या रुग्णांचे वरील रुग्ण निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. काल मालेगाव शहरातील पोलीस लाईनमध्ये राहणाऱ्या दोन रुग्णांचा अहवाल बाधित आढळून आला होता. दोघांवर नाशिकमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मालेगाव शहरात करोना बाधित रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आज एकाच दिवशी मालेगावात आठ अहवाल बाधित आढळून आल्याने मालेगाव शहरातील रुग्णसंख्या १२६ वर पोहोचली आहे.

आतापर्यंत मालेगावमध्ये  १३ बाधित रुग्ण दगावले आहेत तर मागील आधीचे चार संशयितांचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नसल्याचे समजते. सद्यस्थितीत नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ११ रुग्ण करोना संक्रमित असून त्यातील एक रुग्ण पूर्णपणे बरा होऊन कोरोना मुक्त झाला आहे. नाशिक ग्रामीण भागातून ०५  रुग्ण करोना बाधित असून त्यातील एक रुग्ण पूर्णतः बरा होऊन करोना मुक्त झाला आहे. मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात १२६ कोरोना संक्रमित आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण १४२ कोरोना बाधित रुग्ण आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या