मालेगाव : पवित्र रमजान पर्वाच्या प्रारंभीच दोन धर्मगुरूंसह पाच दगावले

मालेगाव : पवित्र रमजान पर्वाच्या प्रारंभीच दोन धर्मगुरूंसह पाच दगावले

मालेगाव | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक करोना बाधित रुग्ण असलेल्या मालेगाव शहरातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे. मात्र, प्रादुर्भाव रोखण्यात अद्याप यंत्रणेला यश आलेले नाही.गेल्या 24 तासांत करोना बाधित वृद्धासह चौघा संशयितांचा मृत्यू मालेगावात झाला आहे. तसेच आज चार वर्षाच्या बालिकेसह आठ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने करोना बाधितांची संख्या १२६ वर जाऊन पोहोचली असून प्रशासनासह जनतेच्या चिंतेत भर पडली आहे.

पवित्र रमजान पर्वाच्या प्रारंभीच आज मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान दोन धर्मगुरुंचे अकस्मात निधन झाले. यामुळे मालेगाव शहरात शोककळा पसरली आहे. या दोघा धर्मगुरूंचा स्त्रावचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यावरच मृत्यूचे निदान स्पष्ट होईल. दुपारच्या सुमारास गुलशेर नगर भागातील 55 वर्षीय इसमास करोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने त्याचा मन्सुरा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरु असताना सदर रुग्णाचा मृत्यू झाला.

या रुग्णाच्या घशाचे स्त्राव पाठविण्यात आले असून अहवाल आल्यावरच मृत्यूचे निदान स्पष्ट होईल. दरम्यान, काल मध्यरात्री जीवन हॉस्पिटल मध्ये 73 वर्षीय करोना बाधित वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एका 55 वर्षीय संशयित रुग्ण महिलादेखील उपचारादरम्यान मृत्युमुखी पडल्याचे सूत्रांनी सांगितले.

आज दुपारी शहरातील आठ संशयित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये चार वर्षांच्या बालिकेचा असलेला समावेश शहरवासियांना धक्का देणारा ठरला.

या बाधितांमध्ये नया इस्लामपुरा भागातील चार वर्षीय बालिका तसेच 25 महिलेचा समावेश आहे. याच भागात 30 वर्षीय इसम देखील बाधित आढळून आला आहे. 36 व 38 वर्षीय दोन पुरुष तसेच उस्मानाबाद भागात 61 वर्षीय वृद्ध व 36 वर्षे व जाफर नगर भागातील 65 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com