Friday, April 26, 2024
Homeनाशिकमालेगाव शहरात ११९ ठिकाणे कंटेनमेंट झोन; ९० टक्के क्षेत्र प्रतिबंधित

मालेगाव शहरात ११९ ठिकाणे कंटेनमेंट झोन; ९० टक्के क्षेत्र प्रतिबंधित

मालेगाव | प्रतिनिधी

शहरात गत आठ दिवसांत 159 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 37 रुग्ण शहरातील नवीन भागातील असल्याने विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या 37 ठिकाणांना कंटेनमेंट झोनचा दर्जा मनपा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. प्रतिबंधित क्षेत्राची संख्या 82 वरून थेट 119 वर जाऊन पोहोचल्याने जवळपास 90 टक्के शहर प्रतिबंधित क्षेत्रात समाविष्ट झाल्याने नागरिक मात्र हवालदिल झाले आहेत.

- Advertisement -

शहरातील पवारवाडी, लोढा भुवन , गोंडवाडा , व्यंकटेश नगर वसाहत, ऐश्वर्या मंगल कार्यालय परिसर, अग्रसेन भवन, वृंदावन चौक, शहर पोलीस स्टेशन, हीरापुरा, शिवनगर द्याने, यूती प्रोसेस, रचना कॉलनी, टिपरे कॉलनी गायत्री नगर, पटेल नगर, सिद्धार्थ वाडी, रसूलपुरा 2, आंबेडकर नगर, सर सय्यद नगर, रेस्ट हाऊस परिसर, गुलशन इब्राहीम , शिंपी मंगल कार्यालय, स्वामी समर्थ कॉलनी समर्थ नगर ओमकार कॉलनी उत्कर्ष कॉलनी प्रथम लॉन्स माळी चा बाग बिस्मिल्ला नगर सावता चौक केम रोड आयुक्त निवास परिसर ताश्कंद बाग सावता नगर पंचशील नगर चिंतामणी लॉन्स सुख सागर लॉज व साई सेलिब्रेशन लॉन्स परिसर या 37नवीन भागांना कंटेनमेंट क्षेत्राचा दर्जा मनपा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

शहरात 7 ते 14 मे दरम्यान 159 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 37 रुग्ण नवीन ठिकाणातून निष्पन्न झाले आहे, यामुळे सदर परिसरात विषाणूचा प्रादुर्भाव फैलावू नये यासाठीमनपा आयुक्त दीपक कासार यांच्या आदेशाने 37 नवीन ठिकाणांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे 82 वरून कंटेनमेंट झोनची संख्या 119 वर जाऊन पोचली आहे.

कंटेनमेंट झोन म्हणून निश्चित करण्यात आलेल्या परिसरात आगामी 14 दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून या भागातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता या भागात कुणासही प्रवेश दिला जाणार नाही. ये-जा साठी एक रस्ता खुला ठेवण्यात येऊन उर्वरित सर्व रस्ते सील करण्यासह पोलीस बंदोबस्त तेथे तैनात करण्याची सूचना आयुक्त कासार यांच्यातर्फे देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या