…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा !
स्थानिक बातम्या

…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा !

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मुंबई :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मनसेच्या नेतेपदी निवडण्यात आले. पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली.

यावेळी अमित ठाकरे यांच्या कुटूंबियांची उपस्थिती होती मात्र राज ठाकरे मात्र मंचावर उपस्थित नव्हते. अमित राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी निवड करत आहोत, अशी घोषणा बाळा नांदगावकर यांनी केली.

त्यानंतर मनसेच्या विद्यार्थी सेनेतर्फे शाल आणि तलवार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमस्थळी टाळ्यांच्या कडकडाटात एकच जल्लोष झाला. नेतेपदी निवड झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी शिक्षणाचा ठराव मांडला.

मुंबईत गोरेगावमधील नेस्को मैदानात मनसेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनची सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या ध्वजाच्या अनावरण केले. मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा आहे. तसेच झेंड्यात पूर्णपणे भगव्या रंगाला स्थान देण्यात आले आहे. स्थापनेनंतर 14 वर्षांनी मनसेने ध्वजाचा रंग आणि राजकारणाची दिशा बदलली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com