हर्षवर्धनला इगतपुरीतून मिळणार ‘चारचाकी’ भेट
स्थानिक बातम्या

हर्षवर्धनला इगतपुरीतून मिळणार ‘चारचाकी’ भेट

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

घोटी | वार्ताहर

महारष्ट्र केसरीवर आपले नाव कोरणाऱ्या नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरला इगतपुरी तालुक्यातील चारचाकी गाडी भेट दिली जाणार असल्याची माहिती इगतपुरी तालीम संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. कालच हर्षवर्धनचे नाशकात जंगी स्वागत करण्यात आले तद्नंतर इगतपुरी तालुक्यातील हर्षवर्धनला चारचाकी गाडी भेट देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी १२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यानंतर  इगतपुरी तालीम संघाचे अध्यक्ष तथा खरेदी विक्री संघाचे सभापती ज्ञानेश्वर लहाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड संदीप गुळवे व बाजार समितीचे उपसभापती गोरख बोडके हे मारुती कंपनीची शोरूम गाडी भेट देणार असून महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याची इगतपुरी तालुक्यातून  जंगी मिरवणूकदेखील काढण्यात येणार असल्याचे समजते.

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्याचे नाव लौकिक केले. कोल्हापूर, सांगली, सातारा पाठोपाठ नाशिक जिल्हा ही मलांची खान आहे हे यावरून सिद्ध होते. यापूर्वी ही राज्याच्या देशाच्या नकाशावर कुस्तीपटलावर जिल्हयातील अनेक नामांकित पहिलवानांनी नेत्रदीपक व उजवल कामगिरी केली.

येत्या बुधवारी (दि.१५) घोटी येथे हर्षवर्धन सदगीर यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम होणार आहे. यावेळी त्यास चारचाकी भेट दिली जाईल असे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, आमदार सुहास अण्णा कांदे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार राहुल ढिकले, गोरखनाना बलकवडे, शाहू खरे, माजी आमदार शिवराम झोले, काशिनाथ मेंगाळ, पांडुरंग गांगड, संजय इंदुलकर, निवृत्ती जाधव, फिरोज पठाण, उदय जाधव, उदय सांगळे, जनार्दन माळी, रघुनाथ तोकडे, भगवान आडोळे हे मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com