राज्यात वीजेची मागणी सहा हजार मेगावॅटने घटली
स्थानिक बातम्या

राज्यात वीजेची मागणी सहा हजार मेगावॅटने घटली

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

सध्या संपूर्ण देशात कोरोणाचा कहर असतांना लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे राज्यभरातील अनेक अस्थापने, कंपन्या बंद असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात राज्यातील विजेची मागणी साधारण सहा हजार मेगवॅटने घटून 16 हजार मेगावॅटवर पोहचली आहे.

राज्यात ऐन उन्हाळ्यात विजेच्या मागणीत वाढत होत असते. मात्रा या वर्षी कोरोणाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे अनेक अस्थापने, कंपन्या बंद आहे. त्यामुळे ऐरवी 22 हजार मेगावॅटवर असलेली विजेची मागणी घटून दि. 7 रोजी 16 हजार 217 मे.वँ. वर येऊन पोहचली आहे.

महाजेकोसह इतर प्रकल्पांमधून 8343 मे.वॅ.इतकी निर्मिती करण्यात आली तर एनटीपीसीकडून जवळपास 8 हजार मे.वॅ. वीज घेण्यात येवून राज्यातील तुट भरण्यात आली.

दरम्यान, दीपनगर प्रकल्पातील वीज महागडी असल्यामुळे व राज्यातील विजेची मागणी घटल्यामुळे प्रकल्पातून वीजनिर्मिती नुकतीच बंद करण्यात आली आहे.

यासह राज्यातील महाजेचकोचे नाशिक, परळी येथील वीजनिर्मिती प्रकल्प बंद करण्यात आली आहे. तर चंद्रपुर महावीजनिर्मिती प्रकल्पातून मंगळवारी 66 मे.वॅ. निर्मिती झाली. खापरखेडा प्रकल्पातून 402, तर कोराडी 1226 मेगावॅट अशी निर्मिती करण्यात आली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com