माजी खासदार व जनलक्ष्मी बँकेचे संस्थापक माधवराव पाटील यांचे निधन
स्थानिक बातम्या

माजी खासदार व जनलक्ष्मी बँकेचे संस्थापक माधवराव पाटील यांचे निधन

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

माजी खासदार आणि जनलक्ष्मी बँकेचे संस्थापक माधवराव पाटील यांचे आज निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. गेल्या दीड महिन्यापासून त्यांच्यावर शहरातील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

पाटील यांनी अनेक वर्षे खरेदी विक्री संघाची  धुरा सांभाळली होती. त्यांच्या जनलक्ष्मी बँकेच्या माध्यमातून नाशिकमधील सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांना मोठा हातभार लाभला होता.

अनेक वर्षे माधवराव पाटील यांनी वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्षपद भूषवले होते.  त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, मुली, सुना आणि नातवंडे असे मोठा परिवार आहे.

सध्या सर्वत्र करोनाचे सावट आहे. यामुळे आज सकाळी सोशल मीडियात पाटील यांच्या निधनाची बातमी पसरू लागल्यानंतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाटील यांना अनेकांनी  श्रद्धांजली अर्पण केली.

Deshdoot
www.deshdoot.com