representative image
representative image
स्थानिक बातम्या

गांधीनगर परिसरात बिबट्या जेरबंद

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

गांधीनगर परिसरातील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (कॅट्स) भागात बिबट्याच्या संचाराने परिसर बिबट्याच्या दहशतीखाली होती. वनविभागाकडून याठिकाणी पिंजरा लावण्यात आला असल्याने या पिंजऱ्यात बिबट्या अखेर आज जेरबंद झाला आहे.

गेल्या गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याची मोठी चर्चा परिसरात होती. आज पहाटेच्या सुमारास मादी जातीचा बिबट्या जेरबंद झाला.

गेल्या आठवड्यात याच परिसरातून नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर आज पहाटेला मादी बिबट्या जेरबंद झाला. या बिबट्याचे वय सात ते आठ वर्षे असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

दरम्यान, सातत्याने याठिकाणी प्रशिक्षण घेणारे जवान आणि अधिकारी बिबट्याच्या पाऊल खुणांचा मागोवा घेत होते. यादरम्यान, बिबट्यासाठीचा पिंजऱ्याचे अनेकदा स्थान बदलण्यात आल्याचे वनविभागाने सांगितले. यानंतर अखेर आज बिबट्या जेरबंद झाला.

Deshdoot
www.deshdoot.com