नगर – जिल्ह्यात सारीचा पहिला बळी,कोपरगावच्या महिलेचा मृत्यू
स्थानिक बातम्या

नगर – जिल्ह्यात सारीचा पहिला बळी,कोपरगावच्या महिलेचा मृत्यू

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनापाठोपाठ सारीनेही नगर जिल्ह्यात डोके वर काढले आहे. कोरोनानंतर सारीचा पहिला मृत्यू जिल्ह्यातील कोपरगाव येथे आज झाला आहे.

कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील ६५ वर्षीय महिला सारीमुळे मृत झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. या महिलेच्या कुटुंबातील ७ जणांनाही प्रशासनाने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. याशिवाय गावातही आरोग्य यंत्रणेने सर्व्हे हाती घेतला आहे. १० तारखेला या महिलेला कोरोना संशयित म्हणून नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठविले होते. तेथे तिची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली, पण तिला सारीची लागन झाल्याचे समोर आले. कोपरगावच्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com