सावधान! ‘हे’ पासवर्ड वापराल तर? २०१९ मधील सर्वात वीक पासवर्ड्स
स्थानिक बातम्या

सावधान! ‘हे’ पासवर्ड वापराल तर? २०१९ मधील सर्वात वीक पासवर्ड्स

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : सध्या डिजिटल युगात सर्वांकडे स्मार्टफोनचा बोलबाला आहे. त्यामुळे प्रत्येकजण मसार्टफोन अथवा इतर संबंधित साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्डचा वापर करीत असतो. परंतु काहीवेळा वीक पासवर्डमुळे हॅक होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे सोपे पासवर्ड असल्याने हॅकर्संना हा पासवर्ड हॅक करणं कठीण राहिलेलं नाही. सहज हॅक करता येतील अशा पासवर्डची यादी सायबर सिक्युरीटी फर्मने जाहीर केली आहे.

सिक्युरीटी सर्व्हिस फर्मने लीक झालेल्या ५० लाखाहून अधिक पासवर्डसची तपासणी केली. यातील अगदी सोप्या आणि सहज हॅक करता येतील अशा 50 पासवर्डची यादी जाहीर करण्यात आली आहे. आपली डिजीटल माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आपला पासवर्ड अधिक कठीण असणं आवश्यक आहे. हे पासवर्ड २०१९ या वर्षातील सर्वात जास्त असुरक्षित पासवर्ड ठरले आहेत.

आपल्याला जर हॅकर्सपासून वाचायचे असेल तर खालील पासवर्ड वापरणे टाळा –

1234, 123456, 123456789, 1234567, 12345, 111111, 123123, 654321, 555555, 7777777, 888888, princess, dragon, password1, welcome, admin, abc123, 

अनेकदा युजर्स आपल्या नावावरून किंवा वैयक्तिक माहितीवरून किंवा सहसा अंकाचा उपयोग करीत असतात. त्यामुळे हॅकर्संना हे पासवर्ड ओळखणं सोप होतं. त्यामुळे पासवर्ड ठेवताना नेहमी वेगवेगळ्या संख्या, अक्षरे आणि संकेतचिन्हांचा वापर करा. जेणे करून तुमचा पासवर्ड हॅक केला जाणार नाही आणि तुमची डिजीटल माहिती सुरक्षित राहिल.

Deshdoot
www.deshdoot.com