87 रिपोर्टची प्रतीक्षा !

87 रिपोर्टची प्रतीक्षा !

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोपरगावात नव्याने कोरोना पेशंट आढळून आल्याने जिल्ह्राात कोरोनाग्रस्ताचा आकडा 27 वर पोहचला. त्यातील एकाचा मृत्यू झाला असून एक बीड जिल्ह्यातील आहे, तर तिघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान कोपरगाव, नगर आणि पाथर्डीतील 87 रिपोर्टची प्रतीक्षा नगरकरांना आहे.

नगर जिल्ह्यात सुरूवातीला विदेशी यात्रेहून जावून आलेले तिघे कोरोनाग्रस्त आढळून आले. त्यानंतर कोरोना संसर्ग थांबेल असे वाटत असतानाच तबलिगी कनेक्शन ओपन झाले. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची साखळीच समोर येत गेली. तीनचे पाहता पाहता 27 झाले. श्रीरामपूर,कोपरगावच्या कोरोना पेशंटचे मात्र अजूनही कोडेच आहे.

मात्र कलेक्टर राहुल द्विवेदी यांनी प्राारी एसपी सागर पाटील यांच्याशी समन्वय ठेवत ही साखळीही ब्रेकअप करण्यात यश मिळविल्याने नगरचा आलेख चढता चढता राहिला. काल कोपरगावात 60 वर्षिय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. या महिलेच्या रुपाने कोरोनाने नगर, श्रीरामपूरनंतर थेट कोपरगावात एन्ट्री मारली. प्रशासन सतर्क झाले.

या महिलेच्या संपर्कात आलेल्या 12 जणांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. त्यांचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. पाथर्डीतील मरकजहून आलेल्या एकाला प्रशासनाने ताब्यात घेतले. त्याच्या संपर्कातील 13 जणांचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. याशिवाय पूर्वीचे प्रलंबित असलेले 62 रिपोर्ट अजूनही आलेले नाही. त्यामुळे नगरकरांना अजूनही त्या 87 रिपोर्टची प्रतीक्षा कायम आहे.

कोपरगाव शंभर टक्के लॉकडाऊन
कोपरगावात पहिलाच रुग्ण आढळून आल्यानंतर खबरदारी म्हणून प्रशासनाने तो परिसर शांर टक्के लॉकडाऊनचा निर्णय घेतला. लक्ष्मीनगरचा हा परिसर प्रशासनाने पूर्णत: पॅकअप केला आहे. कोरोनाग्रस्त असलेल्या महिलेला कोणतीही ट्रॅव्हलिंग हिस्ट्री नाही. त्यामुळे तिला कोरोना संसर्ग झाला कसा? याचा शोध आता तालुका आरोग्य विााग घेत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com