वाहतूकबंदी! भाज्या महागल्या
स्थानिक बातम्या

वाहतूकबंदी! भाज्या महागल्या

Sarvmat Digital

आवक कमी झाल्याचा परिणाम । आडमार्गाला बसताहेत विक्रेते

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरात फळ व पालेभाज्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी सर्वच प्रकारच्या भाज्यांचे दर गगणाला भिडले आहेत. बहुतांश फळभाज्यांच्या किलोच्या दराने शंभरी ओलांडली आहे. तर काही भाज्यांचे दर 150 रुपयांपर्यत पोहचले आहेत. पालेभाज्याच्या गड्डीचे दर 40 ते 50 रुपयांपर्यत पोहचले आहेत. वाढलेल्या दरामुळे भाज्या खरेदी करताना सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होते आहे.

कोरोना विषाणूच्या भितीने शेतकर्‍यांनी बाजारात माल विक्रीला आणणे थांबविले आहे. त्यातच शहरातील बाजर समित्याही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात भाज्यांची विक्री करणार्‍याला घाऊक बाजारात भाज्यांच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे माळीवाडा, चितळे रोड, गाडगीळ पटांगण, सर्जेपुरा, प्रॉफेसर कॉलनी, गुलमोहर रोड, यशोदा नगर, सावेडी, केडगाव, नागपूर, भिगार, शिवाजीनगर, परिसरात भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्केटयार्डातील आडत्यांनी मंगळवारी पत्र काढत मार्केट यार्ड, फळ भाज्या मार्केट व उप बाजर समिती 31 मार्च पर्यत बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. तसे पत्र देखील त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले होते. , शनिवारी बाजार बंद ठेवला होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून किरोकळ बाजारात अत्याअल्प आवक झाली. भाज्यांची आवक न झाल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेतेही अव्वाच्या सव्वा दरांने भाज्यांची विक्री करीत आहेत. त्याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत असल्याचे दिसत आहे.

दरावरून फ्री स्टाईल
मेथीच्या दरावरून ग्राहक व भाजी विक्रेता यांच्यात चांगलीच फ्री स्टाईल झाली. मेथीचे दर का वाढवले अशी विचारणा ग्राहकाने विक्रातःकडे केल्याचा रागातून 3 ते 4 जणांनी मारहाण केली. मार्केट यार्ड परिसरातील फळभाज्या मार्कट कमिटीच्या गेटवर आज सकाळी ही घटना घडली.

भाज्यांचे दर
(प्रति किलो रु.)

हिरवी मिरची 140-160
शेवगा 100-120
वाटाणा 120-140
वांगी 100-120
फ्लावर 80-90
दोडका 70-80
कोबी 80-100
कांदा 60-80
बटाटा 50-70

पालेभाजी (प्रतिजुडी)
किथिंबीर 50-60
मुळा 40-50
मेथी 40-50
पालक 30-40

Deshdoot
www.deshdoot.com