Thursday, April 25, 2024
Homeनाशिकवीरांच्या कार्यक्रमात अचानक आल्या मधमाशा; 15 ते 20 जण जखमी

वीरांच्या कार्यक्रमात अचानक आल्या मधमाशा; 15 ते 20 जण जखमी

खामखेडा येथील घटना

खामखेडा (वार्ताहर)- देवळा तालुक्यातील खामखेडा येथे वीरांच्या कार्यक्रमात आग्यामोहोळाच्या मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात पंधरा ते वीस जण जखमी झाले आहे. त्यांच्यावर खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले तर यापैकी एकाला कळवण उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

- Advertisement -

खामखेडा येथील फांगदर शिवारातील बुटीच्या विहीरीजवळ सोनवणे कुटुंबीयांचा वीरांचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमातील गर्दीमुळे तसेच संबळ वाद्याच्या आवाजामुळे झाडांच्या फांदीला असलेले आग्यामोहोळ चवताळून उठले व तेथील लोकांवर अचानक हल्ला केला. अचानकच मधमाशा चावू लागल्याने एकच धावपळ उडाली. या कार्यक्रमाला जवळजवळ अडीचशे ते तीनशे लोक उपस्थित होते त्यापैकी 15 ते 20 जणांना जास्त प्रमाणात मधमाशा चावल्याने त्यांना उपचारासाठी खामखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री पगार यांनी जखमींवर तत्काळ उपचार केले. जखमींची प्रकृती बरी झाल्याने त्यांना औषधोपचार देऊन घरी सोडून देण्यात आले तर यापैकी एकाला मधमाशांनी जास्त प्रमाणात चावा घेतल्याने त्याला कळवण उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या